विशेष : महाराष्ट्रातील लाखो रुग्णांना देवदूत ठरणारा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष..!

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. उद्धवजी ठाकरे , युवा सेना प्रमुख तथा राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री मा.ना.श्री. आदित्यजी ठाकरे आणि राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कामकाज अथक आणि जोशाने गेली ३ वर्ष सुरू आहे.

१७ नोव्हेंबर २०१७ रोजी म्हणजेच स्व.वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. गेल्या ३ वर्षांच्या कालावधीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून शेकडो महाआरोग्य शिबीरे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच संकट असो की पूरग्रस्त केरळ राज्य असो की सांगली – कोल्हापूर जिथे जिथे आपत्ती आली तिथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून वैद्यकीय पथक मदतकार्यासाठी हजर राहिले. पूर्वाश्रमीच्या पत्रकार राहिलेल्या मंगेश चिवटे यांच्या संकल्पनेतुन सुरू झालेला शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आता नगरविकास मंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि खा.डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आरोग्य सेवकांच एक नेटवर्क उभं राहतय…

या असंख्य रुग्णांना देवदूत ठरलेल्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा…

• मुख्य संकल्पना :

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समाजातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. संबंधित गरजू रूग्ण आणि हॉस्पिटलमध्ये दुवा साधण्याचे काम करत गरजू रुग्णाला राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, गरजू रुग्णाला विविध ट्रस्ट कडून आर्थिक मदत मिळवून देण्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कडून समनव्यची जबाबदारी पार पाडली जाते.

• ठळक बाबी :

✓ शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून आजपर्यंत एकूण ५५ पेक्षा अधिक महाआरोग्य शिबीरात मिळून ३ लाख २५ हजार पेक्षा अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. गेल्या ३ वर्षांत या तपासणीतून निदान झालेल्या हजारो रुग्णांच्या मोफत किंवा सवलतीच्या दरात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या.

✓ गेल्या ३ वर्षांत जवळपास १२ हजार हुन अधिक रुग्णांची मोतीबिंदू, सर्व प्रकारचे कॅन्सर, अँजिओप्लास्टी, बायपास, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, फूफुस किंवा हृदय ट्रान्सप्लांट, लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया, कोकलीयर इम्प्लॉट यांसारख्या शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत किंवा धर्मादाय रुग्णालयात मोफत / सवलतीच्या दरात किंवा संबंधित रुग्णावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णांना बिलात सवलत मिळवून देण्यात कक्षाला यश आले आहे. याची सर्व आकडेवारी उपलब्ध असून शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या या कक्षाच्या माध्यमातून आजवर गेल्या ३ वर्षात एकूण ४५ कोटी रूपयांहून अधिक मदत गरजूं रूग्णांपर्यंत पोहोचवण्यात यश आले आहे. गरजू रूग्ण आणि संबंधित हॉस्पिटल आणि मदत करणाऱ्या विविध ट्रस्ट यामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष दुवा म्हणून काम करते.

✓ यासोबतच २०१९ साली सांगली कोल्हापूर येथे झालेल्या महापुरात ठाणे येथील १०० डॉक्टरांच्या सहकार्याने सुमारे ७५ हजार नागरिकांची मोफत प्राथमिक तपासणी आणि मोफत औषध पुरवठा करण्याच्या नियोजनाची जबाबदारी मा. खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली होती.

✓ केरळ मध्ये २०१८ साली झालेल्या महापुरात देखील शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भरीव मदत कार्य करण्यात आले. ठाणे शहरातील १०० डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने आठवडाभर पूरग्रस्त भागांत सेवा दिली. केरळ येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरांत जवळपास १.५ कोटी तर सांगली कोल्हापूर येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरांत जवळपास २.५ कोटी रुपयांची औषध शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत पुरविण्यात आली होती.

• शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातुन गरजू रुग्णांना नेमकी कशी मदत मिळते..?

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष समाजातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांच्या मदतीसाठी कार्यरत आहे. संबंधित गरजू रूग्ण आणि हॉस्पिटलमध्ये दुवा साधण्याचे काम करत गरजू रुग्णाला राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, गरजू रुग्णाला विविध ट्रस्ट कडून आर्थिक मदत मिळवून देण्यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कडून समनव्यची जबाबदारी पार पाडली जाते.

कॅन्सर, ब्रेन ट्युमर, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, बोन मारो ट्रान्सप्लांट , लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असलेल्या शस्त्रक्रिया, कोकलीयर इम्प्लॉट, अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी आदी महागड्या शस्त्रक्रिया सर्वसामान्य रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत. दरम्यान , अशावेळी घरातील सोनं – नाणं विकून प्रसंगी जमीन विकून खेड्या – पाड्यातील माणूस हॉस्पिटलच्या बिलांची भरमसाठ रक्कम अदा करतो. यावेळी सैरभैर झालेल्या रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना जिवापेक्षा मोठं काहीच दिसतं नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या या दुर्धर आजारांसाठी मदत असलेल्या योजनांचा लाभ घेण्याच्या फंदात सर्वसामान्य माणूस पडत नाही. किंबहुना सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी धारणा असल्याने आपल्या शस्त्रक्रियासाठी वेळेत आर्थिक मदत मिळाली नाही , आणि वेळेत शस्त्रक्रिया झाली नाही तर बरे वाईट होईल या भीतीपोटी संबंधित रूग्ण विविध योजनांचा लाभ घेण्यापासून टाळाटाळ करतो.

अशा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सर्व सहकारी त्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देतात. सोबतच विविध ट्रस्टच्या माध्यमातून संबंधित रुग्णाला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी समनव्यची भूमिका पार पाडतात. यात प्रामुख्याने प्रधानमंत्री सहायता निधी, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट, टाटा ट्रस्ट, कारो ट्रस्ट, चाईल्ड हेल्प फौंडेशन, जय गणेश ट्रस्ट आदी ट्रस्टकडून अर्थसहाय्य मिळते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्व.धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी स्थापन केलेल्या जय अंबे माँ ट्रस्टच्या माध्यमातून तसेंच डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन ट्रस्टच्या माध्यमातून राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब गरजू रुग्णांना थेट अर्थसाहाय्य करतात.

• शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कामकाज कसे चालते..? व याची कार्यालय कुठे आहेत? गरजू रुग्णांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी कसा संपर्क साधावा..?

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधणाऱ्या रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना प्रथमतः कक्षातील वैद्यकीय सहायकांकडून मानसिक आधार देण्यात येतो. आम्ही आपल्यासोबत आहोत, शस्त्रक्रिया महागडी असली तरी आपण मार्ग काढू, हॉस्पिटलमध्ये संपर्क करू, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना आहेत आपण त्यामधून संबंधित शस्त्रक्रिया मोफत किंवा सवलतीच्या दरात करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वस्त करण्यात येते. रुग्णांना विविध ट्रस्ट आर्थिक मदत देतात यासाठी कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येते.

शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सध्या मुंबई, ठाणे आणि पुणे येथे ३ प्रमुख कार्यालय आहेत. यापैकी शिवसेना भवन , दादर ( पश्चिम ) येथे प्रधान कार्यालय आहे. शिवसेना भवन येथे कक्षाचे कामकाज सोमवार ते शुक्रवार असे आठवडयातील ५ दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू असते. वैद्यकीय सहाय्यक श्री प्रसाद सुर्यराव या ठिकाणी कार्यालय व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. तर ठाणे पूर्वेतील कोपरी येथील ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वॉर रूम मध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ठाण्यातील कक्षाचे कार्यालय 24*7 कार्यरत असते. याच ठिकाणी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली १० वैद्यकीय सहायकांची टीम कार्यरत आहे. या ठिकाणी वैद्यकीय सहाय्यक श्री माऊली धुळगंडे कार्यालय व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. तर पुणे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख व पुणे शहर प्रमुख श्री राजाभाऊ भिलारे यांनी आपल्या स्वतःच्या कार्यालयात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्यालय सुरू केले आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत हे कार्यालय आहे.

कार्यालय क्रमांक १ –
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,
तळ मजला, शिवसेना भवन,
दादर ( पश्चिम ) , मुंबई.
दूरध्वनी – 022 – 25322525

कार्यालय क्रमांक २ –
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,
मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब
यांचे जनसंपर्क कार्यालय,
मंगला हायस्कूल शेजारी, कोपरी,
ठाणे ( पूर्व )
दूरध्वनी – 022 – 25322567

कार्यालय क्रमांक ३ –
शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष,
शेडगे आळी, सदाशिव पेठ,
पुणे.
दूरध्वनी – 8907776015
श्री राजाभाऊ भिलारे.

• गेल्या ३ वर्षांतील शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची उपलब्धी काय आहे?

ठाणे जिल्हा पालकमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन यांच्या सहकार्याने शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातून आजपर्यंत एकूण ५५ पेक्षा अधिक महाआरोग्य शिबीरात मिळून ३ लाख २५ हजार पेक्षा अधिक नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली आहे. गेल्या ३ वर्षांत या तपासणीतून निदान झालेल्या हजारो रुग्णांवर मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

मागील ३ वर्षांत जवळपास १२ हजार हुन अधिक रुग्णांची मोतीबिंदू, एन्जीओप्लास्टी, बायपास, किडनी ट्रान्सप्लांट, लिव्हर ट्रान्सप्लांट, लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया, कोकलीयर इम्प्लॉट यांसारख्या शस्त्रक्रिया महात्मा फुले योजनेअंतर्गत किंवा धर्मादाय रुग्णालयात मोफत / सवलतीच्या दरात किंवा संबंधित रुग्णावर शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर रुग्णांना बिलात सवलत मिळवून देण्यात कक्षाला यश आले आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या या कक्षातून आजवर ४५ कोटी रूपयांहून अधिक मदत गरजूं रूग्णांपर्यंत पोहोचवण्यात कक्षाला यश आले आहे.गोरगरीब गरजू रूग्ण , संबंधित हॉस्पिटल आणि मदत करणाऱ्या विविध सेवाभावी ट्रस्ट यामध्ये शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष दुवा ठरला आहे.

यासोबतच केरळ आणि सांगली कोल्हापूर येथे झालेल्या महापुरात ठाणे येथील १०० डॉक्टरांच्या सहकार्याने सुमारे ७५ हजार नागरिकांची मोफत प्राथमिक तपासणी आणि मोफत औषध पुरवठा करण्याच्या नियोजनाची जबाबदारी मा. खा.डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली होती. केरळ मध्ये महापुराच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिरांत जवळपास १.५ कोटी तर सांगली कोल्हापूर येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरांत जवळपास २.५ कोटी रुपयांची औषध शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मोफत पुरविण्यात आली होती.

• मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची मूळ संकल्पना – निर्मिती आणि सुरुवात :

वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची संकल्पना मांडण्या अगोदर मंगेश चिवटे यांनी सध्या राज्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या योजनेची मूळ संकल्पना मांडली होती.

पूर्वाश्रमीचे पत्रकार असलेल्या आणि विद्यमान शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख असलेल्या मंगेश चिवटे यांचा मंत्रालयात एकीकडे इलेट्रॉनिक माध्यमात पत्रकारिता करत असतानाच दुसरीकडे मात्र आरोग्य विषयक कामामध्ये विशेष रस होता. गावाकडील गोरगरीब रुग्णांची मुंबईतील विविध धर्मशाळामध्ये राहण्याची व्यवस्था करणे, धर्मादाय अंतर्गत नोंदणी असलेल्या रुग्णालयात आर्थिक दुर्बल रुग्णांसाठी आरक्षित असलेले बेड गोरगरीब रुग्णांना उपलब्ध करून देणे आणि त्यांच्यावर मोफत किंवा सवलतीच्या दरात शस्त्रक्रियेसाठी पाठपुरावा करून मंगेश चिवटे यांनी त्यांच्या मित्रांच्या मदतीने शेकडो रुग्णांना लाभ मिळवून दिला होता.

ऑक्टोबर २०१४ मध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंगेश चिवटे सरांनी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्याकडे अर्थिक परिस्थिती हलाखीची असणार्‍या रूग्णांकरिता महागड्या शस्त्रक्रियासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून अर्थ सहाय्य देण्यात यावे म्हणून ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा’ची संकल्पना मांडली आणि याची सुरूवात करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या सलग चार महिन्यांच्या पाठपुराव्याला यश आले व १७ मार्च २०१५ मध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीची सुरूवात करण्यात आली. मंगेश चिवटे यांच्याच शिफारशी नुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या प्रमुखपदी ओमप्रकाश शेटे यांची नियुक्ती कऱण्यात आली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून आजवर ५३ हजार पेक्षा अधिक रूग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. ५२६ कोटींचा निधी या उपचारांसाठी मंजूर करण्यात आला आहे. संपुर्ण महाराष्ट्रातून रूग्ण या योजनेचा लाभ घेण्यासाठी येतात. २००५ साली मुंबईत आल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील अचलपुरचे तत्कालीन आमदार आणि विद्यमान जलसंपदा राज्यमंत्री मा ना श्री बच्चू कडू यांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांचे आरोग्य क्षेत्रातील काम पाहून आपल्याला हे काम करण्याची प्रेरणा मिळाली, असे श्री.चिवटे सांगतात.

• पालकमंत्री श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांची नवरात्रात भेट आणि शिवसेना वैद्यकीय मंदत कक्षाची संकल्पनेला प्रत्यक्षात सुरुवात:

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या यशस्वी निर्मितीनंतर शिवसेना पक्षाच्या वतीने गोरगरीब गरजू रुग्णासाठी शिवेसना वैद्यकीय मदत कक्षाची निर्मिती करण्यात यावी अशी संकल्पना मंगेश चिवटे यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे यांच्यासमोर ठेवली. यासाठी त्यांनी वेळोवेळी श्री शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा देखील केला. २०१७ सालच्या नवरात्रोत्सवमध्ये IBN लोकमत वृत्तवाहिनीसाठी स्व.धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी स्थापन केलेल्या जय अंबे माँ नवरात्रोत्सवाचे विशेष कव्हरेज करण्याच्या निमित्ताने ठाण्यात आले असता, मंडपाशेजारील एका छोटेखानी कार्यालयात पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या संकल्पनेला मान्यता दिली. आणि लागलीच वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी त्यांच्याच नावाने ही अनोखी योजना सुरू करण्याचा निर्णय झाला.

त्यानुसार ठाण्यात १७ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा’ची स्थापना करण्यात आली. प्रथमतः ABP माझा, साम TV, जय महाराष्ट्र, IBN लोकमत आदी वृत्तवाहिनीमध्ये पूर्ण वेळ पत्रकार म्हणून काम केलेल्या मंगेश चिवटे यांनी आपले पत्रकारिता करिअर सोडून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि त्यामाध्यमातून गोरगरीब गरजू रुग्णांची आरोग्यसेवा हेच आपले करिअर मानले. आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे आणि खा.डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली गेली ३ वर्षांपासून वैद्यकीय मदत कक्षाचे कक्ष प्रमुख म्हणून मंगेश चिवटे हे काम पाहत आहेत. आज या कक्षात १५ वैद्यकीय साहाय्यकांच्या माध्यमातून आरोग्य सेवेचे कार्य सुरू आहे.

• खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाला समर्थ साथ कशी मिळाली.? त्यांच्या नेतृत्वाखाली महाआरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन कसे केले गेले..?

वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून २९,३० एप्रिल आणि १ मे २०१८ रोजी असे एकूण सलग ३ दिवस ठाणे शहर जिल्ह्यातील आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. एकूण ३ दिवसांत सुमारे २५ हजार पेक्षा अधिक नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. या तपासणीत आढळून आलेल्या तब्बल ५५० हुन रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. एकूण २ हजार पेक्षा जास्त वयोवृद्ध रुग्णांना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. हृदयाचा प्रॉब्लेम असलेल्या ५० पेक्षा अधिक रुग्णांच्या मोफत अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मुंबईतील टाटा हॉस्पिटल, जे.जे.हॉस्पिटल, K. E.M. हॉस्पिटल आदी नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीम सोबतच ठाणे शहरातील इंडियन मेडिकल असोसिशन, वागळे इस्टेट डॉक्टर असोसिशनचे मिळून एकूण १ हजार डॉक्टरांनी रुग्णांना मोफत सेवा दिली. अर्थातच या शिबिराचे सर्व नियोजन कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांनी एकहाती लिलया पेलले. या पाठोपाठ १३ आणि १४ मे २०१८ रोजी पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण येथे २ दिवसीय महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या दोन्ही शिबिरांत खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपली खासदारकीची झुल बाजूला ठेवत एक डॉक्टर म्हणून रुग्णांना तपासले आणि आरोग्य सेवा दिली. या दोन्ही शिबिरांच्या यशस्वी आयोजनाची दखल प्रिंट मीडिया – इलेक्ट्रॉनिक मिडिया सहित शिवसेनेच्या शिर्षस्थ नेतृत्वाने घेतली.

पुढे, ऑगस्ट २०१८ मध्ये केरळ राज्यातील अलेप्पी जिल्ह्यात महापुरात मदत कार्य करण्यासाठी देखील डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला. ठाण्यातील सुमारे १०० डॉक्टरांच्या वैद्यकीय मदत पथकाने केरळमध्ये आठवडाभर मुक्काम करून पूरग्रस्त नागरिकांची तपासणी केली. यावेळी डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून सुमारे १.५० कोटी रुपयांची औषधे मोफत वितर्रीत करण्यात आली.

• शिवसेना भवन येथे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना कधी झाली..?

ठाणे जिल्हा पालकमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे आणि
खा.डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याची घोडदौड सुरू होती. दरम्यान युवा सेना प्रमुख मा ना श्री आदित्य ठाकरे आणि युवा सेना सचिव मा श्री वरुणजी सरदेसाई व शिवसेना सचिव मा श्री सुरजजी चव्हाण यांनी दिलेल्या आदेशानुसार शिवसेना भवन या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूत शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कामकाज राज्यभर अधिक व्यापक प्रमाणात करण्यास सुरुवात झाली.

१७ नोव्हेंबर २०१८ रोजी शिवसेना पक्ष प्रमुख, तथा मुख्यमंत्री मा.ना.श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा सेना प्रमुख व पर्यावरण मंत्री मा.ना.श्री. आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या तसेच राज्याचे नगरविकास मंत्री मा ना श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते शिवसेना भवनातील तळ मजल्यावर शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे अत्याधुनिक कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी युवा सेना सचिव मा श्री वरुण सरदेसाई आणि शिवसेना सचिव मा श्री सुरज चव्हाण व मुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी मा श्री डॉ श्रीकांत पंडित देखील उपस्थित होते. सध्या शिवसेना भवनात वैद्यकीय सहाय्यक श्री प्रसाद सूर्यराव व श्री अरविंद मांडवकर कार्यालय व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत.

• या देवदूत कक्षाची धुरा सांभाळणाऱ्या मंगेश चिवटे यांची पत्रकारिता कारकीर्द :

इलेक्ट्रॉनिक मीडियात लहान वयात मिळालेल्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न मंगेश चिवटे यांनी केला. २००८ साली सुरुवातीला स्टार माझासाठी मंत्रालय प्रतिनिधी, त्यानंतर जय महाराष्ट्र वृत्तवाहीनी साठी दिल्ली येथे ब्यूरो चीफ, साम टी व्ही साठी मुख्य राजकीय वार्ताहर आणि त्यांनंतर IBN लोकमत मध्ये उप वृत्तसंपादक असा त्यांचा पत्रकारितेमधील प्रवास राहिला आहे.

मंगेश चिवटे यांनी आपल्या १० वर्षाच्या पत्रकारितेच्या कारकिर्दित राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, भाजपाचे राज्याचे नेते स्व गोपिनाथजी मुंडे, काँग्रेसचे राज्याचे नेते तथा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख , काँग्रेस प्रदेशअद्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण , माजी उपमुख्यमंत्री आर आर आबा पाटील यांसारख्या दिग्गजांची मुलाखती घेतल्या आहेत. २६/११ च्या मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला स्टार माझाकडून कव्हर करण्याची संधी त्यांना मिळाली होती. त्यावेळी तत्कालीन ATS प्रमुख शहीद हेमंत करकरे यांची CST स्टेशनमध्ये आत प्रवेश करतानाची दृश्य त्यांनी टिपली होती. भारताला पहिले ओलम्पिक मेडल मिळवून देणाऱ्या कुस्तीपटू स्व खाशाबा जाधव यांस मरणोत्तर भारतरत्न सन्मान मिळावा, त्यांच्या जन्मगावी आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल उभारावे तसेच त्यांच्या जयंतीदिनी राज्यात क्रीडा दिन साजरा करण्यात यावा यासंदर्भात IBN लोकमतवर केलेल्या विशेष बातमीची विधानसभेत चर्चा झाली होती.

– रणवीर रजपूत, (नि.गव्हर्नमेंट मिडिया, म.शा.), ठाणे 9920674219

Leave a Reply

Your email address will not be published.