विशेष लेख : टर्म इन्शुरन्स प्लॅन का महत्वाचा..?

टर्म इन्शुरन्स प्लान हा लाइफ इन्शुरन्स पॉलिसीचा एक महत्वाचा भाग ठरतो. ज्याद्वारे एका विशिष्ट कालावधीसाठी पॉलिसी धारकाला प्रीमीयम भरावा लागतो. हा प्लान अकाली किंवा अकस्मात मृत्यूसाठी उपयोगाचा ठरतो. या पॉलिसीच्या कालावधी दरम्यान मृत्यू झाल्यास पॉलिसी धारकाच्या कुटुंबीयांना कवरेज रक्कम मिळते. मात्र पॉलिसी धारकाला काही झालं नाही तर मात्र या पॉलिसीचा लाभ मिळत नाही. ही पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यावर त्याचा लाभ पॉलिसी धारकाला मिळत नाही.

विम्याच्या इतर पर्यायांचा विचार केला तर टर्म प्लानचा प्रीमीयम सर्वात कमी आहे. तोदेखील अशा व्यक्तींसाठी ज्यांचं वय कमी आहे. जितक्या कमी वयात टर्म इन्शुरन्स प्लानमध्ये गुंतवणूक कराल तितका प्रीमीयम कमी आणि लाभ जास्त होतो.

अकस्मात मृत्यू झाल्यास जे कव्हर आपल्याला टर्म इन्शुरन्सद्वारे मिळते त्याला रिस्क कव्हर प्लान असं म्हटलं जातं. या रिस्क कव्हर प्लानची खासियत ही असते की पॉलिसी धारकाचा मृत्यू झाल्यास जी पॉलिसीची देय रक्कम ठरली आहे ती सगळी रक्कम पॉलिसी धारकाच्या कुटुंबीयांना मिळते. ज्यामुळे पॉलिसी धारकाच्या कुटुंबांचे पुढचे आयुष्य सुकर होऊ शकते. घर विकत घेणं असेल किंवा मुलांचं शिक्षण असेल अशासाठीही हे प्लान उपयोगी ठरु शकतात.

मात्र पैसे गुंतवल्यानंतर टर्म इन्शुरन्स प्लान नेमकी काय भूमिका बजावतो असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे की रिस्क मॅनेजमेंट. हवे ते लक्ष्य गाठायचे असेल तर इक्विटीज, डेबिट तर त्यासाठी रिस्क प्रोफाइल पाहणं महत्वाचं आहे. पीपीएफ, म्युच्युअल फंड्स आणि गुंतवणुकीच्या इतर पर्यायांमध्ये यांचं एक वेगळं महत्व आहे. या सगळ्या पर्यायांमध्ये गुंतवणूकदार जिवंत असणं आवश्यक आहे.

टर्म इन्शुरन्स योजनेत दीर्घ मुदतीची उद्दीष्टं पाळली जाऊ शकत नाहीत. टर्म इन्शुरन्स पॉलिसीद्वारे मिळालेली रक्कम हयात असलेल्या कुटुंबातील व्यक्तींना मिळते. मात्र ती दीर्घकाळ मिळेल हे निश्चित नसतं.

तुमची स्वतःची टर्म इन्शुरन्स पॉलिसी असणं किती महत्वाचं असतं हे तुमच्या लक्षात आलं असेलच. प्रत्येकाने रिस्क कव्हर करणारा टर्म इन्शुरन्स प्लानमध्ये पैसे गुंतवणं हे महत्वाचं आहे. जो कुणी आर्थिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून आहे अशा व्यक्तींनीही टर्म इन्शुरन्समध्ये पैसे गुंतवणूक करणं गरजेचं आहे. यापैकी कुणी विद्यार्थी असू शकतो किंवा आर्थिकदृष्ट्या मागास असणारे माता-पिता असोत. कुणीही टर्म इन्शुरन्समध्ये गुंतवणूक करु शकतो. मुलांना मोठं करायचं असो, करिअरचे पर्याय असोत किंवा इतर काही गरजा असोत त्यासाठी हा प्लान महत्वाचा ठरतो. टर्म इन्शुरन्स प्लान हे तुमच्या आर्थिक गुंतवणुकीची ब्ल्यू प्रिंट ठरु शकते.

टर्म इन्शुरन्सच्या उपलब्ध व्याप्तीसह एखादी व्यक्ती त्याचं सगळं आयुष्य आणि त्याला आयुष्यात गाठायचं ध्येय हे अगदी सहजरित्या प्राप्त करु शकते. आर्थिक गुंतवणुकीसाठी पहिली पायरी हे टर्म इन्शुरन्स प्लान महत्वाचे ठरतात. टर्म इन्शुरन्स प्लानमध्ये गुंतवणूक करा आणि चिंतारहित आयुष्य जगा.

– दीपक पवार ( विमा तज्ञ )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *