
| पुणे | खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरे (55) यांचे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर गेल्या 25 दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.
कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर पुण्यातील एका खासगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. 25 दिवसांपासून हे उपचार सुरु होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून गोरे यांना 2009 मध्ये देण्यात आलेली खेडची उमेदवारी काही कारणास्तव रद्द केली होती, त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करुन ते आमदार झाले होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ आणि आई असा परिवार आहे. गोरे यांनी चाकण विधान परिषदे गटाचे सदस्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.
- नकळत सारे घडते..!
- मैं अपनी फेव्हरेट हूँ..!
- “पडळकर हुल्लडबाजी करतात, त्यांना त्यांची औकात दाखवून देवू.!” भाजपच्या युतीतील राष्ट्रीय समाज पक्षाचा भाजपच्या पडळकरांवर हल्लाबोल..!
- २०१८ ते २०२१ पर्यंतचे ‘कोमसाप’चे वाङ्मयीन-वाङ्मयेतर पुरस्कार जाहीर..!
- पारनेर तालुक्यातील गारगुंडी गावात होणार ‘भिर्रर.. भिर्रर !’, १ जून रोजी संपन्न होणार बैलगाड्यांच्या भव्य शर्यती..!