श्रीगोंदा पोलिसांची चमकदार कामगिरी, अट्टल गुन्हेगाराला अटक; मुद्देमालासह ५ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त..

| पुणे / महादेव बंडगर | श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने नुकतीच सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह ५ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी दरोडा, जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात फरारी असणारा आरोपी सुरेश देवराम गायकवाड, राहणार- भिंगार तालुका -श्रीगोंदा यास अटक करून सोन्या-चांदीचे मंगळसूत्र, टॉप्स , मोहनमाळ,
सोन्याची चेन असे १६ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, २ मोटरसायकल त्यामध्ये एक होंडा शाईन व स्प्लेंडर गाडीचा समावेश आहे. तसेच एक मोबाईल फोन असा ऐवज जप्त केला आहे. त्याच्यावर श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये ८ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. दि.१५ डिसेंबर २०१९ मध्ये तुलसाईनगर ,काष्टी येथे बंद घरात कुलूप तोडून घरफोडी झाली होती. तेथून सोन्या-चांदीचे दागिने चोरीस गेले होते त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर ११५१/२०१९ भा द वि ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल होता.

तसेच अविनाश शिवराज भोसले राहणार खंडाळा तालुका कर्जत व दिलीप उर्फ देख्या शांताराम चव्हाण यांच्याकडून तीन ग्रॅम चे सोन्याचे मंगळसूत्र, एक चोरीचा मोबाईल व चांदीचे पैंजण असा २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशा प्रकारे एकूण ३ सराईत गुन्हेगारांना अटक करून ३ जबरी चोरी, ४ घरफोडी, २ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण ५ लाख ५६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल श्रीगोंदा पोलिसांनी हस्तगत केला आहे.

याप्रकरणी मा. पोलीस अधीक्षक अखीलेश कुमार सिंह, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप हे करीत होते. दिनांक १६/९/२०२० रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सपोनि राजेंद्र सानप, पोलीस हेडकॉन्स्टेबल अंकुश ढवळे , प्रकाश मांडगे, पो कॉ गोकुळ इंगवले, संजय काळे , योगेश सुपेकर, प्रताप देवकाते, प्रशांत राठोड यांनी तांत्रिक व गोपनीय पद्धतीने तपास करून वरील आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठांकडून तसेच तालुक्यातील नागरिकांकडून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *