शालेय विद्यार्थ्यांच्या निरोगी आरोग्यासाठी हेल्थ किटची मौल्यवान भेट; फर्स्ट हॅण्ड फाऊंडेशन व एम्बॅस्सी कंपनीचा स्तुत्य उपक्रम..

| पुणे | मुळशी तालुक्यातील आयटी पार्कच्या परिसरातील शाळांमधील विद्यार्थाना फर्स्ट हॅण्ड फाऊंडेशन व एम्बॅस्सी कंपनीच्या वतीने हेल्थ किटचे वाटप मुळशी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री. माणिक बांगर व कंपनीच्या मनुष्यबळ विभागप्रमुख सारा जोसेफ यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माण येथे संपन्न झाले.

जगभर कोरोना रोगाच्या साथीने थैमान घातले आहे, शाळा बंद आहेत. विद्यार्थी घरी राहून अध्ययन करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे निरोगी आरोग्य कायम राहावे म्हणून मुळशी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या पाठपुराव्याने माण हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्क स्थित एम्बॅस्सी कंपनी व बंगळूर मधील फर्स्ट हॅण्ड फाऊंडेशन या स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून ५ हजार विद्यार्थाना हेल्थ किट वाटप करण्यात आले.

मुळशी तालुक्यातील माण, हिंजवडी , महाळुंगे , ताथवडे , भोईरवाडी या शाळांमधील सर्व विद्यार्थांना हेल्थ किटचे वाटप करण्यात आले. या हेल्थ किटमध्ये मास्क, हॅण्ड सॅनिटाइजर , साबण, शॅम्पू, टूथब्रश, टूथपेस्ट, नेलकटर, कंगवा असे प्रत्येकी ३५० रुपये किंमतीचे साहित्य आहे. ‘विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम राहिले तर विदयार्थी मन लावून अध्ययन करु शकतात, या हेल्थ किटच्या माध्यमातून विद्यार्थांना आरोग्यविषयक चांगल्या सवयी लागतील व वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व लक्षात येईल. एम्बॅस्सी कंपनी ने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करत या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक गट शिक्षणाधिकारी श्री. माणिक बांगर यांनी केले.

कोरोना काळामध्ये वैयक्तिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे, या हेल्थ किट माध्यमातून विद्यार्थी स्वच्छतेच्या सवयींसाठी अधिक जागरूक होतील तसेच कंपनीच्या माध्यमातून विद्यार्थी पालक यांचे आरोग्य शिक्षण विषयक प्रशिक्षण आगामी काळात घेतले जाईल असे एम्बॅस्सी कंपनीच्या मनुष्यबळ विभाग प्रमुख सारा जोसेफ यांनी म्हटले.

युवा व्याख्याते व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. यशराज पारखी यांनी हेल्थ किट वाटप उपक्रमाचे कौतुक केले. हा नवोपक्रम विद्यार्ध्यांच्या शालेय जीवनात बदल घडवणारा ठरेल, विदयार्थी पालक यांना स्वच्छतेचे महत्व सांगितले. मारुंजी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. सुरेश साबळे यांनी उपस्थित पालकांचे वैयक्तिक स्वच्छताविषयी उदबोधन केले.

या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समिती माण चे उपाध्यक्ष पंडीत गवारे, सदस्य पांडुरंग महाडिक , नवनाथ पारखी, पंचायत समितीचे साधन व्यक्ती नवनाथ दर्शले, माण शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम वाघमारे, अनुपमा ढोक, कमल नाईकनवरे, स्वाती पोटघन, वर्षा सकपाळ, विनायक शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास कदम यांनी केले तर प्रा. सूरज कांबळे यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *