
| सोलापूर | महाविकास आघाडीत थोड्या फार कुरबुरी सुरू आहेत हे सत्य असले तरी आता मात्र शिवसेना उमेदवाराच्या पुत्राने राष्ट्रवादीच्या आमदारावर खोटे प्रमाणपत्र निवडणुकीत वापरले म्हणून आरोप केले आहेत. हे प्रकरण आहे मोहोळ मतदारसंघातील. मोहोळ विधानसभा राखीव मतदारसंघाचे विद्यमान यशवंत माने यांचे दोन जातीचे दाखले असून त्यांनी बोगस जातीचा दाखला काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना तत्कालीन उमेदवाराचे पुत्र सोमेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत केलाय. याबाबत त्यांनी आमदार यशवंत माने यांचे दोन्ही दाखले यावेळी पत्रकार परिषदेत सादर केले.
बुलडाणा जिल्ह्यात कैकाडी समाज हा SC मध्ये गणला जातो. त्यानुसार यशवंत माने यांच्याकडे SC चे जात प्रमाणपत्र आहे तर पुणे जिल्ह्यात कैकाडी समाज हा VJ विमुक्त वर्गात येतो. त्यामुळे आमदार माने हे मागील १०० वर्षापासून इंदापूर तालुक्यात राहत असून त्यांनी बुलडाण्यातून SC वर्गाचा जातीचा दाखला दाखल करुन निवडणूक आयोगाची फसवणूक केलीय.
आमदार माने यांचा कैकाडी समाजाचा इंदापूरमधील शेळगावचा दाखला हा VJ विमुक्त वर्गातील असून १९८५ साली त्यांनी हा दाखला काढला होता तर बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीमधून त्यांनी SC चा दाखला काढून त्यावर मोहोळ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढवल्याचा दावा तक्रारदार सोमेश क्षीरसागर यांनी यावेळी केला. याबाबत बुलडाणा जातपडताळणी कार्यालयाकडे याबाबत तक्रार दाखल केली असून मोहोळ पोलिस स्टेशनमध्ये देखील फिर्याद दिल्याचा दावा सोमेश क्षीरसागर यांनी केलाय.
दरम्यान या आरोपाबाबत मोहोळचे आमदार यशवंत माने यांना विचारले असता, क्षीरसागर यांनी केलेल्या आरोपाबद्दल मला फार काही बोलायचे नाही. त्यांना जे आरोप करायचे आहेत ते करु द्या. मी यावर काही प्रतिक्रिया देणार नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री