शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतुक सेना तालुका अध्यक्ष पदी किशोर चौधरी तर उपाध्यक्ष पदी चेतन माळी यांची नियुक्ती..

| भिवंडी / रवी वर्मा | शिवसेना प्रणित महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी यांनी किशोर चौधरी याची महाराष्ट्र वाहतुक सेना भिवंडी तालुका अध्यक्ष पदी तर उपाध्यक्ष पदी चेतन माळी यांना निवडीचे पञ दिले. दरम्यान भिवंडी पुर्वचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी वाहतुक सेनेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन करु‌न पुढील वाटचालीस शुभेच्छा देखील‌ दिल्या आहेत.

यावेळी महाराष्ट्र राज्य वाहतुक सेनेचे सरचिटणीस सुर्यकांत तांडेल, वाहतुक सेनेचे भिवंडी शहर अध्यक्ष मुशीर मोमीन, उत्तम चौधरी,आखिल शेख उपस्थित होते. कोरोना काळात सर्वत्र लाॅकडाऊन मुळे सर्व व्यवसाय डबघाईला गेले आहे त्यामुळे आज वाहतुकदारांना खंबीर नेतृत्वाची गरज असून त्यांची विश्वासहर्ता जपणे ही अत्यंत महत्वपूर्ण बाब आहे.

सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने सर्वसामान्य वाहतुकदार व जनतेला अभिप्रेत असणारी वाहतूक सेना उभारु व एक वर्षाच्या काळात सर्वांना बरोबर घेऊनच काम करणार असल्याचे यावेळी नवनिर्वाचित भिवंडी तालुका अध्यक्ष किशोर चौधरी यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *