शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का..! या कार्यतत्पर नेत्याचे निधन..!

| कल्याण | कोरोना महामारीच्या काळात लोकांमध्ये प्रत्यक्ष जावून काम करणाऱ्या अनेक नेत्यांना कोरोनाने गाठले, त्यातच त्यांचे निधन देखील झाले आहे. असेच कल्याण मधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक, गटनेते तथा पदाधिकारी दशरथ घाडीगावकर यांचे आज निधन झाले.

प्रभाग क्रमांक ३९, वालधुनी या परिसरातून निवडणूक आलेले दशरथ घाडीगावकर एक आक्रमक आणि कट्टर शिवसैनिक म्हणून सर्व कल्याणकर जनतेत प्रसिद्ध होते. सर्वसामान्य जनतेशी त्यांची नाळ जोडलेली होती. सामाजिक तसेच राजकीय कारकिर्दीत त्यांनी अतिशय जबाबदारीने दिलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण केले होते.

शिवसेनेचे कल्याणमधील पदाधिकारी दिपक सोनाळकर यांच्या निधनानंतर अजुन एका महत्वाच्या तडफदार पदाधिकाऱ्याचे निधन झाल्याने शिवसेनेत शोककळा पसरली असून पालकमंत्री एकनाथ शिंदे , खासदार डॉ श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथ भोईर, महानगरप्रमुख विजय साळवी यांनी देखील या घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *