| मुंबई | राज्यातील आदिवासी भागातील सुमारे 1 लाख 21 हजार गरोदर महिला व स्तनदा मातांना आणि 6 लाख 51 हजार बालकांना डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दूध भुकटीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. आशा सेविका, अंगणवाडी सेविकांमार्फत या दूध भुकटीचे वाटप होणार आहे.
लॉकडाऊन काळात राज्यातील दूधभुकटीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. या अतिरिक्त दूध भुकटीच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महानंद मार्फत उत्पादित होणारी ही अतिरिक्त दूध भुकटीचा वापर आदिवासी भागातील गरोदर महिला, स्तनदा माता तसेच बालकांना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघांने (महानंद) डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दूध भुकटीचे मोफत वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केली आहे. दूध भुकटीचे वितरण करण्याची ठिकाणे कळविण्यासंदर्भात महानंदने आदिवासी विकास विभागास कळविले आहे.
राज्यातील 16 जिल्ह्यातील आदिवासी भागातील 1 लाख 21 हजार स्तनदा माता व गरोदर महिलांना प्रति दिन 25 ग्रॅम आणि 6 लाख 51 हजार बालकांना प्रति दिन 18 ग्रॅम दूध भुकटीचे वितरण अमृत आहार योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. या योजनेसाठी एक वर्षासाठी सुमारे 5750 मेट्रिक टन दूध भुकटी लागणार आहे. ही संपूर्ण योजना महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघामार्फत (महानंद) एक वर्षासाठी राबविण्यात येणार आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .