संदीप देशपांडेंची मार्मिक टिप्पणी, अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?’

| मुंबई | महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर हवा, असे म्हणत संजय राऊत यांनी आज ‘रोखठोक’मधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साद घातली आहे. याला राज ठाकरे यांनी उत्तर दिलेले नाही. मात्र संदीप देशपांडे यांनी यावर त्यांचे मत मांडले आहे. मी जे बोलतोय ती पक्षाची अधिकृत भूमिका नाही तर ते माझे मत आहे. पक्षाची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यानंतर ते म्हणाले, ‘महाभारतामध्ये कर्णाच्या रथाचं चाक जेव्हा जमिनीत रुतलं होतं तेव्हा कृष्णाने कर्णाला जो प्रश्न विचारला तोच मला आज शिवसेनेला विचारायचा आहे. अभिमन्यू जेव्हा एकटा लढत होता तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म कर्णा?’ असा प्रश्न विचारत संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्या आवाहनाला रोखठोक उत्तर दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.