संपादकीय : काही ‘नंगे’, काही ‘घुबडिनी’ आणि ‘खुदा’ची सेना..!

नंगे से खुदा डरे.. अशी एक प्रसिद्ध म्हण आहे ! सभ्य माणसानं नंगाड लोकांच्या नादी लागू नये, असा छुपा संदेश म्हणा किंवा भीती, लोकांच्या मनात त्यातून वर्षानुवर्षे पेरली जात आहे.

२०१४ पासून देशात सर्वत्र ‘खुदा डरे..’ असाच माहोल आहे. २०१९ च्या नंतर तो आणखीच खराब झाला. २०१९ पर्यंत ‘बिचारा खुदा..’ नंग्याला पाहून गुपचूप आपला रस्ता बदलून घ्यायचा. त्यामुळे नंग्याची हिम्मत आणखीच वाढली. आता तो सरळ सरळ खुदाच्या घरासमोर, चौकात येवून.. आपल्या परिवारासह नागडा नाचायला लागला. आणि बिचारे खुदा आपापल्या खिडक्यांच्या फटीतून त्यांचा हा तमाशा मुकाट्यानं बघत राहिले !

ताज्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं धक्कादायक तऱ्हेनं यांना धोबी पछाड मारली आणि यांचं ए टू झेड.. शिवता येणार नाही, अशा तऱ्हेनं फाटलं ! कुजक्या वस्तू तशाही शिवण्याच्या लायकीच्या राहात नाही ! पण बाजार बसव्या संस्कृतीला हे सारं समजावून सांगण्याचं काम त्यांच्यातल्याच कुणीतरी शहाण्या माणसानं करायला हवं आहे !

२०१४ नंतर देशाच्या राजकारणात मानसिक रुग्णांना चांगले दिवस आलेत. महाराष्ट्राचं राजकारण एवढ्या बेवकुफ पातळीवर गेल्याचं या आधी कधीही पाहिलं नव्हतं. खुर्ची गेल्याच्या झटक्यातून अजूनही काही लोक सावरलेले नाहीत ! आपलीच चड्डी फाडत फिरतात.

ज्या कोंबडीची अंडी खात खात साप लहानाचा मोठा झाला, तिलाच गिळण्याचा खानदानी संस्कार उफाळून वर आला आणि इथंच घात झाला. कोंबडीच्या परिवारात काही गरुडाची पिलं देखील असू शकतात, ह्याची सापांना कल्पनाच नव्हती. अजूनही आलेली दिसत नाही. अर्थात घुबडांच्या कळपात गरुडांचा इतिहास सांगायचा नसतो, हीच परंपरा असेल, तर त्यांचा तरी काय दोष ?

पूर्वीचे कपटी राजे / सरदार वगैरे पदरी विषकन्या बाळगायचे. शत्रूंच्या विरोधात त्यांचा वापर करायचे. आता लोकशाही आहे. काळ खूप पुढे गेला आहेत, तरी अजूनही अंधार युगात वावरणारे काही पक्ष माणसात आलेले दिसत नाही. आता ते विषकन्ये ऐवजी ‘घुबडिनी’ पाळतात. साऱ्या देशाचा सत्यानाश करायला मोजक्या घुबडीनी पुरेशा आहेत, हे सारा देश अनुभवतो आहेच !

सापानं पाळलेल्या अशाच एखाद्या घुबडीनीचं अनधिकृत घरटं जर कायद्यानं तोडलं असेल, तर घुबड परिवार आणि सापांची टोळी बोंब मारणारच आहे ! तो त्यांचा धंदा आहे ! पण कायदा चुकला असेल, तर घुबडांनी न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा आहेच ना ? मग आपणही अन्यायाचा निषेध करू या.. त्यात काय मोठं ? पण म्हणून घुबडीनीचा ‘उल्लाला उल्लाला’ काय ‘शुभं करोती..’ समजून स्वीकारायचा का ?

मी मागेही एका लेखात लिहिलं होतं, की यांच्याकडे असलेल्या दोन नंबरवाल्या सापाचे अनेक बाप सेनेकडे जिल्ह्या जिल्ह्यात आहेत. तेव्हा, उगाच त्यांना काडी करण्याचा मूर्खपणा या लोकांनी करू नये. ‘आ बैल मेरी मार..’ चा छिनाल ‘होशियारी’ प्रयोग नुकताच करून झाला आहे. तेव्हाची सूज अजुनही उतरली नाही. तेव्हा पुन्हा नसल्या भानगडी करू नयेत, ह्यातच या लोकांचं भलं आहे !

नदीला डोह असतो. डोहाला पुर येत नाही. पूर आला की डोहाचं अस्तित्व तेवढ्या पुरतं मिटून जाते. डोहाला लाटाही येत नाहीत. डोहात भोवरे मात्र असतात. भल्याभल्यांना डोहाच्या खोलीचा अंदाज येत नाही. कारण डोह वरून तसा शांत दिसतो. आपल्यातच मग्न असतो..!

अशा डोहावर एक चकवा असतो, अशी दंतकथा आम्ही लहानपणी ऐकायचो ! तो चकवा भल्याभल्यांना भुलवतो. डोहाकडे नेतो आणि बुडवून बुडवून मारतो ! एरवी कुणाच्याही वाटेला न जाणारा डोह, त्याच्या नादी लागणाराचं मात्र होत्याचं नव्हतं करून टाकतो !

महाराष्ट्रात असा एक डोह आहे ! मुंबईच्या बाजूलाच गुजरात पण आहे. तिथल्या लोकांनी तरी निदान काळजी घ्यायला हवी. उगाच भ्रमात राहू नये. आमच्या शेजारी मित्रांनी त्यांना तशी कल्पना द्यायला हवी. की ते सुद्धा मुंबईच्या प्रेमात भागीदार आहेत..?

बाकी काही असो, पण घुबडीनीच्या भरवश्यावर गरुडांशी लढाई करण्याचा नाद सपांनी सोडावा, ह्यातच त्यांचं भलं आहे ! फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचा हा संदेश बिहार विधान सभेच्या निमित्तानं सापांच्या कळपाला हमखास मिळेल, अशी आशा आहे !

तोवर.. शिवरायांची तलवार म्यानातून बाहेर निघायचा मुहूर्त झालाच आहे, आपण आनंद साजरा करू या.. मानाचा मुजरा करू या..!

– ज्ञानेश वाकुडकर, अध्यक्ष, लोकजागर अभियान ( अतिथी संपादक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *