समाजसेवेचा अविरत यज्ञ; ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयातून घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा..

| दैनिक लोकशक्ती ऑनलाईन / ठाणे | एमएमआर क्षेत्रातील वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमएमआर क्षेत्रातील सर्व पालिकांच्या आयुक्तांना दिल्या. कोरोना पॉझिटिव्ह असूनही रुग्णालयातून एकनाथ शिंदे यांनी कोविड केंद्र, त्यातील मनुष्यबळ, ऑक्सिजन तसेच औषधांची उपलब्धता, रुग्णवाहिकांची सोय याचा आढावा घेतला.

होम आयसोलेशन मध्ये उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांचे ट्रेसिंग तसेच सार्वजनिक ठिकाणी राज्य आणि केंद्र शासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचा सूचना देत मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत संबंधित यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शिंदे यांनी दिले. ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच लहान मुले यांना ओमायक्रोनचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता, त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करावे लागल्यास त्यांना स्टेबल करून त्यानंतरच इतर रुग्णालयात हलवावे याबाबत खासगी रुग्णालयांना सूचना देण्याबाबत शिंदे यांनी निर्देश दिले. या ऑनलाईन बैठकीला एमएमआर क्षेत्रातील सर्व महानगरपालिकांचे आयुक्त, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, सर्व नगरपालिकांचे मुख्याधिकारी तसेच संबंधित यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.