| इंदापूर / महादेव बंडगर | भिगवन पोलिसांनी तक्रारवाडी हद्दीमध्ये शुभम पेट्रोलपंपावर थांबलेल्या टेम्पोमधून 100 पोती चोरून नेणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात यश मिळवले आहे. नुकतीच 24 सप्टेंबर रोजी अवैध वाळू उपसा करणाऱ्या बोटींवर भिगवण पोलिसांनी धडक कारवाई करून 12 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता.आणि बोटीवरील परप्रांतीय मजूर तसेच बोटमालकांवर गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर आजची ही कारवाई करण्यात आली आहे. या आरोपींकडून सिमेंट चोरीचे खूप मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. कारण भिगवण जवळवून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर खडकी ते भादलवाडी पर्यंत अनेक ढाबे आहेत. तेथे थांबलेल्या ट्रकमधून नेहमी डिझेल, पैसे, माल चोरीला जाण्याचे गुन्हे घडत असतात. यापूर्वी यामध्ये सक्रिय असणाऱ्या एका टोळीवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 367/ 2020 प्रमाणे हा गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात दिनांक 27/08 /2020 चे रात्री 11.00 वाजेपासून 28/ 08/ 2020 चे सकाळी 06.00 वाजण्याच्या दरम्यान शुभम पेट्रोल पंप जवळ लावलेल्या टेम्पोतून अज्ञात चोरट्यांनी 100 पोती सिमेंट किंमत रूपये 40, 000/ चे चोरीस गेले होते. सदर चोरीबाबत दिनांक 19/ 9/ 2020 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा उघडकीस आणणे बाबत मा. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख सर यांनी सूचना दिलेल्या होत्या. गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषण वरून तपासी अंमलदार पो.ना.जाधव बं.नं. 1784 यांनी आरोपींची माहिती काढून सदर गुन्ह्यातील 4 आरोपी नामे 1) संतोष राजेंद्र गुणवरे वय पंचवीस वर्ष 2) परशुराम नामदेव डोणगे वय 25 वर्ष 3) आकाश विठ्ठल आडागळे वय 27 वर्ष 4) विजय दिलीप शिंदे वय 30 वर्ष, सर्व राहणार भिगवण स्टेशन ता. इंदापूर जिल्हा पुणे यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपी अटक करून गुन्हा उघडकीस आणुन त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला 100% माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. मिलिंद मोहिते, मा. उपविभागीय अधिकारी श्री. नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने, पो.ना सुधाकर जाधव व त्यांच्या पथकाने पार पाडली आहे.या कारवाईमुळे अनेक मोठे मासे जाळ्यात सापडण्याची शक्यता आहे. जीवन माने यांनी आपल्या कार्यशैलीमुळे या परिसरातील गुन्हेगारांवर मोठा वचक बसवला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .