| मुंबई | महाराष्ट्र सरकारने घर घेण्यार्यांना मुद्रांक शुल्क आणि गृह कर्जात सूट दिल्यामुळे, ग्राहकांना फायदा झाला आहे. कोरोना काळातही लोकांनी मोठ्या प्रमाणात घरं खरेदी केल्यामुळे, रिअल इस्टेट क्षेत्रालाही दिलासा मिळाला आहे. नोंदणी विभागानं दिलेल्या माहितीनुसार डिसेंबरच्या पहिल्या पंधरावड्यातच जवळजवळ 9 हजार घरांची विक्री झाली आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रिअल इस्टेट भागात पूर्वीपासून मंदी सुरू होती. त्यात यंदाच्या काळात कोरोना संकटामुळे त्यात भर पडली. या मंदीतून बाहेर पडायला वर्षे लागतील असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला होता.
कोरोनाच्या काळात सगळ्याच व्यवसायांना फटका बसला. यामध्ये रिअल इस्टेट हे क्षेत्रही होतं. डिसेंबर महिन्यातील १९ दिवसांत मुंबईतील मालमत्तांच्या नोंदणीने १० हजार ४५७ चा आकडा गाठला आहे. २०१२ नंतर प्रथमच इतक्या मोठय़ा प्रमाणात घरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले आहेत.
या महिन्यात १९ डिसेंबपर्यंत राज्यातील मालमत्तांचे खरेदी-विक्री व्यवहार एक लाख ३९ हजारांपर्यंत पोहचले . घरांच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांची नोंदणी करण्यासाठी मोठय़ा संख्येने ग्राहक नोंदणी कार्यालयात येत आहेत. हा प्रतिसाद पाहता डिसेंबरअखेपर्यंत घरांच्या विक्रीत आणखी मोठी भर पडण्याची शक्यता आहे.
कोरोनाच्या काळातही घरांना सर्वाधिक मागणी आहे. महत्वाचं म्हणजे ग्राहकांकडून तयार घरांना सर्वाधिक मागणी आहे. आताच्या परिस्थितीत गृहकर्जावरील व्याजदर कमी झाले आहेत. मागील दोन-तीन वर्षांत घरांच्या किमतीही १५ ते १७ टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. सध्या राज्य सरकारच्या सवलतीमुळे यात भर पडली आहे. विकासकांनी सवलती सुरूच ठेवल्या तर भविष्यात घर घेण्याच्या विचारात असलेले ग्राहकही आताच नोंदणी करतील. ग्राहकांकडून सध्या तयार घरांना अधिक मागणी आहे
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .