सौरभ गांगुली भाजपचा पश्चिम बंगाल मधील मुख्यमंत्री पदाचा चेहरा..?

| कोलकाता | सौरव गांगुली एक महान फलंदाज होते. ते बीसीसीआयचे अध्यक्ष देखील होते. एक प्रशासक म्हणून चांगले काम केल्यावर त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद भूषवावे, अशी मागणीही झाली होती. पण गांगुली यांनी ही गोष्ट केली नाही. कारण त्यांना देशाच्या राजकारणात उतरायचे होते, अशी सूत्रांची माहिती आहे.

गांगुली यांचा बंगालमध्ये चांगला नावलौकिक आहे. अजूनही गांगुली यांच्यासाठी चाहते वेडे आहेत. या गोष्टीचाच फायदा भाजपा उचलणार असल्याचे समजते. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे तृणमूल काँग्रेस पक्षाचे सरकार आहे. तृणमूल काँग्रेस हा भाजपाचा पक्का वैरी समजला जातो. पण भाजपाकडे बंगालमध्ये चांगला चेहरा नसल्याचे म्हटले जात आहे. पुढच्या वर्षी बंगालमध्ये निवडणूका होणार आहेत. त्यामुळे भाजपाला या निवडणूकीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी एक चांगला चेहरा हवा आहे. त्यासाठीच त्यांनी गांगुली यांची निवड केल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये राजकीय वैर आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. काही वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी गांगुली यांना एक जमिन दिली होती. या जमिनीवर गांगुली यांना शाळा आणि महाविद्यालय उभे करायचे होते. पण अजून या जमिनीवर काम झालेले नाही. ममता यांनी दिलेल्या जमिनीवर जर गांगुली यांनी काही काम केले तर भाजपामध्ये प्रवेश करताना ते अंगलट येऊ शकते. त्यामुळे गांगुली यांनी ही जमिन आता बंगालच्या सरकारला परत केली आहे. त्यामुळे गांगुली यांचा भाजपामध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे कयास लावले जात आहेत. आतापर्यंत बऱ्याच खेळाडूंनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भारताचा माजी सलामवीर गौतम गंभीर तर सध्याच भाजपाचा खासदार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *