सलमान खान बद्दल लग्नासह, चाईल्ड ट्रॅफिकिंग बाबत धक्कादायक खुलासे करणारी झूम मीटिंग व्हायरल..!

| मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सलमानचं नाव कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत येतं आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर कंगना रणौतने सलमान खानचं नाव घेऊन नेपोटिझमवर बोट ठेवलं होतं. पण आता सोशल मीडियावर सध्या एक व्हायरल होणाऱ्या झूम मिटिंगची जोरदार चर्चा आहे. यात वकील म्हणवणारे विभोर आनंद यांनी सलमानबद्दल अनेक धक्कादायक विधानं केली आहेत. यात महत्वाचे म्हणजे सलमान विवाहित असून त्याला १७ वर्षांची मुलगी असल्याचा दावा तारखेसकट त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर सलमानला पाकिस्तानी अल्पवयीन मुलं आवडत असल्याचंही त्याने यात म्हटलं आहे.

सलमानचं लग्न यूएईला झालं असून त्याची पत्नी तिकडेच असते असं त्याचं म्हणणं आहे. सलमानचं लग्न २००१ मध्ये झालं होतं. तर त्याला ८ डिसेंबर २००२ मध्ये मुलगी झाली. जी आता १७ वर्षांची आहे आहे असा खुलासा त्याने केला आहे. या सर्व गोष्टीचे पुरावेही आपल्याकडे असल्याचा दावा तो करतो.

सलमानबद्दल या विभोरने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सलमानला पाकिस्तानी अल्पवयीन मुलं आवडतात. याचा थेट संबंध चाईल्ड ट्रॅफिकिंगशी असल्याचं तो सांगतो. त्याच्या फार्महाऊसवर आताही पाच ते सहा मुलं मिळतील जी पाकिस्तानातून आली आहे असा दावा तो करतोय. अंजू महेंद्रू ,शारजाहचा अब्दूल रेहमान सायरा बानू यांचा नातलग मोईन बेग हे तिघे यात सहभागी असल्याचा दावा विभोर करतो. यात चाईल्ड ट्रॅफिकिंग, ड्रग्ज यांचा कुठेना कुठे संबंध आहे असं तो सांगतो.

दरम्यान सोशल मिडियाच्या माध्यमातून या बाबींचा तपास होणं अत्यंत आवश्यक आहे. या क्लिपमध्ये नाव आणि तारखेसकट काही पुरावे दिले गेले आहेत. शिवाय, आपल्याकडे सर्व पुरावे असल्याचा दावाही हा विभोर नामक इसम करतो. आता यावर पोलिसांनी तपास करायला हवा अशी मागणी नेटकऱ्यांनी या व्हिडीओच्या कमेंट्समध्ये केलेली आहे.

https://youtu.be/JzihGf9zpIQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *