सावधान : राज्यातील कोरोनाचे आकडे पुन्हा वाढतायेत.!

| मुंबई | राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येपेक्षा नवीन निदान झालेल्या रुग्णांची अधिक संख्येची मालिका गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काल राज्यात ६ हजार १५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या १७ लाख ९५ हजार ९५९ इतकी झाली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यात दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिवाळीत बाजारात झालेली गर्दी, नातेवाईकांच्या भेटीगाठी यामुळे पुन्हा एकदा रुग्ण संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्याप्रमाणे दिवाळीनंतर कोरोना मुक्त रुग्णांपेक्षा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे.

राज्याला या संकटातून बाहेर काढण्यासाठी मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर, हीच त्रीसूत्री असल्याचं प्रशासनाकडून वेळोवेळी सांगण्यात येत आहे. दिवाळीनंतर कोरोनाविरुद्धची ही लढाई निर्णयाक टप्प्यावर आली आहे.

आज राज्यात ६ हजार १५९ नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. तर, आज ४ हजार ८४४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आता एकूण कोरोना मुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ६३ हजार ७२३ इतकी झाली आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९२. ६४ टक्के इतके झाले आहे. राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना राज्यात जिल्ह्यात मृत्यूदर नियंत्रणात ठेवणं शक्य झाले आहे. आज राज्यात एकूण ६५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २. ६० टक्के इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *