सावधान.. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारत बसत असाल तर दाखल होऊ शकतो गुन्हा..! वाचा – कुठे दाखल झाला आहे गुन्हा..!

| पुणे / महादेव बंडगर | सार्वजनिक ठिकाणी जर आपण विनाकारण गप्पा मारत बसाल तर आपल्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. असाच गुन्हा पुण्यातील इंदापूर मध्ये नोंदविण्यात आला आहे. तालुक्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी सामान्यांच्या मनात धडकी भरवणारी आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी वारंवार लोकांना घरीच राहा, सुरक्षित अंतर ठेवा. गर्दी टाळा यासारख्या सूचना देत आहेत. प्रसारमाध्यमांतून आवाहन करीत आहेत. परंतु नागरिक मात्र याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत. असं दिसू लागलंय. यामुळेच सार्वजनिक ठिकाणी बसून गप्पा मारणाऱ्या मंडळींवर आता भिगवन पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन दिवसात 11 जणांवर सार्वजनिक ठिकाणी विनामास्क बसून गप्पा मारल्याबद्दल गुन्हे दाखल केल्याची माहिती भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.13 सप्टेंबर 2020 रोजी
आरोपी -1 ) दादा गौतम तोरडमल ( पाटील ) वय 30 वर्षे , रा – थोरातनगर भिगवण ता इंदापुर जि पुणे , 2 ) विकास माणिक सकट वय 23.धंदा -ड्रायव्हर , रा- तक्रारवाडी ता इंदापुर जि पुणे . 3 ) गणेश दादा भिसे वय-24 वर्षे , धंदा – ड्रायव्हर रा – भिगवण , ता इंदापुर जि पुणे . 4 ) प्रदिप बापु गायकवाड वय 52 वर्षे रा- भिगवण ता – इंदापुर जि पुणे , 5 ) महेंद्र रमेश शेलार वय 27 वर्षे , रा . भिगवण स्टेशन ता.इंदापूर जि पुणे हे भिगवण येथील हॉटेल राजवर्धनी समोर चौकात विनामास्क गप्पा मारत उभे होते.

तसेच आरोपी -1 ) मोहन किसन शेळके वय 60 वर्षे 2 ) नाना दिगंबर मस्के वय 52 वर्षे 3 ) रायचंद सोपान उघडे वय 49 वर्षे 4 ) लक्ष्मण नामदेव दंडवते वय 52 वर्षे 5 ) साबीर अमीर शेख वय 33 वर्षे 6 ) गौतम तुकाराम पोंदकुले वय 47 वर्षे सर्व रा.भिगवण स्टेशन ता.इंदापुर जि.पुणे हे भिगवण स्टेशन येथील चौकात गप्पा मारत सार्वजनिक ठिकाणी उभे होते.

कोरोना रुग्णांचे संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने त्या अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी सो पुणे यांनी त्यांचा कार्यालयीन जावक क्र पगक कावि / 3889 / 2020 पुणे 1 दिनांक 09/09/2020 अन्वये तसेच मा.प्रांत सो बारामती यांचे कार्यालयीन जा.क्र.आ.व्य कोरोना / क्र 1062/2020 बारामती दिनाक 11/09/2020 अन्वये दिनांक 12/09/2020 रोजी ते दिनांक 20/09/2020 रोजीपर्यंत निर्बंध कडक करण्यात आलेले असून नागरिकांचे संचार करण्यावर निर्बध करण्यात आलेले आहेत हे माहित असतानाही वरील सर्व आरोपी विना मास्क सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसून गप्पा मारत बसलेले मिळून आलेने त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37 ( 1 ) व ( 3 ) चे आदेशाचा भंग केला असताना मिळून आले आहेत म्हणून त्यांचेविरुद्ध मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे दिले फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार काळे हे करीत आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *