“सेवा सप्ताह”निमित्त भाजप युवा मोर्चाचे तेजस देवकाते यांची स्वखर्चातून भिगवण कोविड सेंटरला साहित्यरूपी मदत..

| इंदापूर / महादेव बंडगर | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सालाबादप्रमाणे याही वर्षी “सेवा सप्ताहाचे” आयोजन करण्यात आले आहे. दि. 14 ते 20 सप्टेंबर या कालावधीत सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्ताने भाजपा युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष किरण दगडे, इंदापूर तालुकाध्यक्ष शरद जामदार यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता युवा मोर्चा चे बारामती लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष तथा मदनवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच तेजस देवकाते यांनी स्वखर्चातून भिगवण कोव्हिड सेंटर येथे वाफेचे मशीन ,कोव्हिड रुग्णांसाठी लागणारे काढयाचे साहित्य ,हँडवॉश यासारखे अनेक उपयोगी साहित्य भेट दिले. परिसरातील विविध समाजोपयोगी विधायक उपक्रमांमध्ये देवकाते यांचा नेहमीच उस्फुर्त सहभाग असतो.

भिगवण कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मृदुला जगताप स्वतः आयुर्वेदिक काढा बनवतात. त्याचा चांगला परिणाम रुग्णांना होत असलेला दिसून येतो.त्यामुळे लोकसहभागातून त्यासाठी आवश्यक साहित्य मिळवतात. तसेच याठिकाणी रुग्णांना लागणाऱ्या आवश्यक सेवासुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळे तेथील सेवासुविधांबाबत सर्वपक्षीय पदाधिकारी त्यांचे नेहमीच कौतुक करतात.

या कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते मारुती वनवे, इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे,अशोक पाचांगणे, रोटरीचे अध्यक्ष संपत बंडगर, तालुका उपाध्यक्ष माऊली मारकड ,नानासाहेब बंडगर, योगेश बंडगर, सागर गायकवाड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने यापुढील काळात भिगवण कोव्हिड सेंटरला लागेल ती मदत करण्याचे आश्वासन युवा मोर्चाचे बारामती लोकसभा अध्यक्ष देवकाते यांनी दिले. तसेच या सेवा सप्ताहानिमित्त युवा मोर्चाच्या माध्यमातून भिगवण परिसरामध्ये स्वच्छता अभियान व वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याचेही तेजस देवकाते यांनी सांगितले.डॉ. मृदुला जगताप यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *