सुशांतसिंग बाबत नक्की झाले काय..? एम्स च्या पथकाने दिली ही माहिती..!

| मुंबई | अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या निधनानंतर मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणात एम्सच्या पथकाने अतिशय महत्वाची माहित दिली आहे. सुशांतसिंग राजपूतची हत्या झालेली नसून ती आत्महत्याच आहे. एम्सच्या फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी ही माहिती दिली आहे.

सुशांतची हत्या झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. रिपोर्टनुसार, ज्या परिस्थितीत सुशांतच निधन झालं आहे. त्यामध्ये कोणताही फाऊल प्ले नाही. हे आत्महत्येचं प्रकरण आहे. AIIMS मेडिकल बोर्डाने सोमवारी सीबीआयकडे आपला रिपोर्ट दिला आहे.

सुशांतच्या शवविच्छेदन अहवालाची चौकशी करण्यासाठी 21 ऑगस्ट रोजी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्वात एम्सच्या पाच डॉक्टरांची समिती तयार केली गेली. 20 सप्टेंबर रोजी हे पथक आपला अहवाल सादर करणार होते. मात्र याला 8 दिवसांचा उशीर झाला. 28 सप्टेंबर रोजी एम्सने आपला अहवाल सीबीआयकडे सोपवला. माध्यमांतील वृत्तानुसार, एम्सच्या डॉक्टरांना व्हिसेरामध्ये कोणत्याही प्रकारचे विष आढळलेले नाही.

सुत्रांच्या माहितीनुसार, सुशांतच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करणार्‍या मुंबईतील कुपर रुग्णालयाच्या डॉक्टरांना या अहवालात क्लीन चीट देण्यात आलेली नाही. सुशांतचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयातील डॉक्टरांनी केले होते. परंतु त्यांनी दिलेल्या रिपोर्टवर प्रश्न उपस्थित झाले होते. सुशांतच्या गळ्यावर मिळालेल्या जखमांचा अहवालात उल्लेख नव्हता. शिवाय त्याच्या मृत्यूची वेळ देखील त्यात नमूद करण्यात आलेली नव्हती. यानंतर सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसेच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *