सुशांतसिंह प्रकरण आता CBI कडे , सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

| नवी दिल्ली | सुशांतसिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांकडे न देता सीबीआयकडे सोपवला आहे. यासोबतच मुंबई पोलिसांना फटकारलंही आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. तसेच मुंबई पोलिसांना सीबीआयची मदत करण्याचेही आदेश यावेळी देण्यात आले. न्यायलयाने आपला निकाल सांगताना स्पष्ट केलं की, या प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोणताही तपास केला नाही फक्त चौकशी केली. आता या प्रकरणाशी निगडीत सर्व तपास सीबीआयच करेल.

न्यायालयाच्या सुनावणीमध्ये ३५ पानांचा निकाल दिला आणि पटणामध्ये दाखल केलेल्या एफआयआरला योग्य असल्याचंही मान्य केलं. तसेच बिहार पोलीस प्रकरणाची चौकशी करण्यास सक्षम असल्याचं न्यायलयाने यावेळी सांगितलं. पटणा न्यायालयाने दाखल केलेल्या एफआयआरला योग्य ठरवण्यात आलं आहे. याशिवाय मुंबई पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास केला नसल्याचं न्यायलयाने सांगितलं.

सुशांतसिंह प्रकरणात मुंबई पोलिसांनी कोणताही तपास करण्याऐवजी फक्त चौकशी केली. अखरे सर्वोच्च न्यायलयाने हे संपूर्ण प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा अंतिम निर्णय घेतला. तसेच या पुढे जर कोणाविरोधात एफआयआर दाखल झाली तर ती सीबीआयच पाहील असंही न्यायलयाने स्पष्ट केलं.
सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूचा तपास करण्यात सीबीआय सक्षम असून आता कोणत्याही राज्य पोलिसांनी यात हस्तक्षेप करायचा नाही. सुशांतचे वडील केके सिंह यांचे वकील विकास सिंग यांनी एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं की, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निर्णयात स्पष्ट केलं की सीबीआय चौकशीसाठी बिहार सरकार सक्षम आहे आणि पटणात दाखल केलेली एफआयआरही योग्य आहे.

ईडीच्या चौकशीत सुशांतच्या वडिलांनी केले धक्कादायक खुलासे
न्यायालयाच्या निर्णयानंतर सुशांतच्या घरच्यांनीही न्यायलयाचे आभार मानत सत्याचा विजय झाल्याच्या भावना व्यक्त केल्या. तसेच सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेनेही न्याय मुर्तीचा फोटो शेअर करत सत्याचा विजय असं कॅप्शनही दिलं. सर्वोच्च न्यायलयाच्या निकालाचं अभिनेत्री कंगना रणौतनेही स्वागत केलं. तिने आपली प्रतिक्रिया मांडताना म्हटलं की, न्यायालयाच्या या निर्णयाने लोकांचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. यासोबतच सुशांतच्या केसमध्ये आता न्याय होईल याचा विश्वासही न्यायालयाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *