संसदेचे हिवाळी अधिवेशन कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द..!

| नवी दिल्ली | संसदेचे हिवाळी अधिवेशन यावेळी होणार नाही. दिल्लीत कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार होते. परंतु, यावेळी कोरोना संक्रमणामुळे अधिवेशन होणार नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबतच हिवाळी अधिवेशन होणार आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असल्याची माहिती संसदीय कार्यालयाकडून देण्यात आली.

संसदेचे हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान घेण्यात येते. मात्र, कोरोनामुळे यंदाचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यात आले आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नवीन वर्षात १ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनासोबतच हिवाळी अधिवेशन घेण्यात येईल.

सप्टेंबरमध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करत सदस्यांची आसन व्यवस्था लोकसभा आणि राज्यसभा या सदनामध्ये करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी अनेक संसद सदस्य आणि कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कालावधीमध्ये 40 जण कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू देखील कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर या कालावधीत झाले होते.

तर कन्याकुमारीचे खासदार एच. वसंताकुमार, तिरुपतीचे खासदार बाली दुर्ग प्रसाद, राज्यसभेचे खासदार अशोक गस्ती यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *