सूर्यवंशीमध्ये झळकणार राणी मुखर्जी..

रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये अक्षय, अजय देवगण आणि रणवीर सिंह ही मंडळी पोलीस अधिकाऱ्याच्या रोलमध्ये दिसणार आहेत. या सर्वांनी यापूर्वी पोलीस अधिकाऱ्याचे रोल केले आहेत. आता त्यांच्याबरोबर याबाबतीतली चर्चा बी टाऊनमध्ये सुरू आहे. मात्र अद्याप त्याचे ऑफिशियल कन्फर्मेशन करण्यात आलेले नाही.

सिनेमाच्या क्‍लायमॅक्‍समध्ये एक लेडी पोलीस ऑफिसर असायला हवी, असे रोहित शेट्टीला वाटले आणि त्याने राणी मुखर्जीची निवड केली असल्याचे समजते आहे. राणी मुखर्जीनेही यापूर्वी पोलीस अधिकारी महिलेचा रोल मर्दानी आणि मर्दानी 2मधून साकारला आहे. त्यामुळे बाकीच्या अजय आणि रणवीर सिंहप्रमाणे ज्यांनी पूर्वी पोलीस अधिकारी साकारला आहे, त्याची हजेरी सूर्यवंशीमध्ये होण्याचे समिकरण राणीच्या बाबतीतही बरोबर लागू पडते आहे.

सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमारच्या बरोबर कतरिना कैफ असणार आहे. हे दोघेही बऱ्याच दिवसांनी एकत्र आले आहेत. अक्षयकडे याव्यतिरिक्‍त पृथ्वीराज देखील आहे. त्यात त्याच्या बरोबर पूर्वीची मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर असणार आहे. तर लक्ष्मी बॉम्बमध्ये त्याच्याबरोबर कियारा आडवाणी असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *