सोन्याचे भाव गगनाला भिडले

| मुंबई | सराफा बाजारात मोठी तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण गेल्या २४ तासात सोन्याचा भाव तब्बल ३ हजार रुपयांनी वाढला आहे. मुंबईतील सोन्याचा भाव ५४ हजाराच्या पुढे गेला आहे. मुंबईत मंगळवारी सोन्याचा भाव जीएसटीसह तब्बल ५४ हजार ८२८ रुपये प्रतितोळा इतका आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन, अनलॉकिंगनंतर उर्वरित बाजारात व्यापार काहीसे ठप्प आहेत. मात्र सराफ बाजारात तेजी पाहायला मिळत आहे.

सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे पुण्यात सोन्याचे दर ५४ हजार तोळ्यापर्यंत गेले आहेत, तर चांदीचे दर ७० हजार किलोपर्यंत पोहोचले आहेत. गेल्या दीड वर्षातील सोन्याची ही सर्वात मोठी दरवाढ आहे, तर गेल्या चार महिन्यात चांदीचे दर दुप्पट झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *