हक्काच्या जुन्या पेन्शनसाठी २ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन देशभरात साजरा करणार संकल्प दिवस..!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन व राष्ट्रीय पेन्शन बहाली अभियान (NMOPS) यांच्या वतीने जूनी पेन्शनच्या मागणीसाठी राष्ट्रीय स्तरावर २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पेन्शन संकल्प दिन साजरा करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटनचे राज्याध्यक्ष श्री.वितेश खांडेकर यांनी दिली. १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन ऐवजी पारिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावर कर्मचाऱ्यांना व राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वगळून सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस) लागू करण्यात आली आहे. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची प्रक्रिया चालू आहे.

१ नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन लढा देत आहे. जूनी पेन्शन साठी संघटनच्या वतीने नागपूर येथे आक्रोश मोर्चा , मुंडन मोर्चा, आझाद मैदानावर धरणे आंदोलन , लाक्षणिक उपोषण, पेन्शन दिंडी करण्यात आले. जिल्हा स्तरावर घंटानाद आंदोलन आयोजित केले आहेत. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ट्विटर , फेसबुकवर देखिल विविध ट्रेडिंग आंदोलन करण्यात येत आहेत.

२ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी पेन्शन संकल्प दिवस साजरा करण्यात येत आहे.

असे आहे पेन्शन संकल्प दिवस स्वरुप :

१) २ ऑक्टोबर ला पेन्शन संकल्प दिवस साजरा करताना जर शक्य असल्यास तालुका, जिल्हा पातळीवर एकत्रित येऊन महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला, पुतळ्याला अभिवादन करण्याचा सामुहिक फोटो, हातात पेन्शन संबंधीत स्लोगन लिहिलेल्या पाट्या घेऊन, घोषणा देत फोटो, व्हिडिओ सोशल मीडिया मध्ये पोस्ट करायचे आहेत.
२) २ ऑक्टोबर ला ट्विटर बरोबरच मेल चा ही उपयोगा आपण करणार आहोत. यात सकाळी ११.०० ते २.०० पर्यंत मेल व नंतर दुपार ३.०० ते ६.०० ट्विट असे संकल्प दिवसाचे स्वरुप असेल.
३) यावेळेस मेल व ट्विटर करताना विशेष लक्ष देण्याची बाब म्हणजे राष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान व वित्त मंत्री यांना व जास्तीत जास्त आपल्या महाराष्ट्रातील नेत्यांना मेल व ट्विट करायचे आहे. यावेळेस मेल व ट्विट करण्याचे मॅसेज हे प्रश्नार्थक स्वरूपात असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.