हँड ऑफ गॉड ला जीवनाच्या मैदानावर रेड कार्ड, जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरोडोनाचे निधन..!

| मुंबई | अर्जेंटिना चा जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरोडोनाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नुकताच साठी पार केलेल्या दिएगो मॅरोडोना वर मागील ३ आठवडयापूर्वी मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

फुटबॉल च्या मैदानावर आपल्या जादूई खेळाने फुटबॉलप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मॅरडोना चर्चेला गेला तो १९८६च्या फुटबॉल विश्वचषकामध्ये इंग्लंडविरुद्ध हाताने केलेल्या गोल मुळे ! त्या एका अफलातून खेळीने इंग्लंडचे विश्वचषक जिकण्याचे स्वप्न काही क्षणात उध्वस्त केले होते. तेव्हापासूनच हँड ऑफ गॉड नावाने तो ओळखला जाऊ लागाला.

जपानमध्ये १९७९ साली झालेल्या २० वर्षाखालील फुटबॉल विश्वचषक अर्जेंटिनाला जिंकून देत आपल्या फुटबॉल कारकिर्दीची सुरुवात केली. अर्जेटिनास १९८६ चा विश्वचषक विजेतेपद व १९९० विश्वचषकामध्ये उपविजेतेपद मिळून देण्यात मॅरोडोनाचा सिंहाचा वाटा होता. मॅरोडोनाची फुटबॉल खेळाडू इतकीच फूटबॉल संघ व्यवस्थापक म्हणून देखिल कारकिर्द यशस्वी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *