#हाथरस_प्रकरण : महाराष्ट्रावर आसूड ओढणारे हे वाचाळवीर आहेत कुठे..?

| मुंबई | उत्तर प्रदेशात हाथरस येथे दलित तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि भयंकर हत्याकांडाने अवघा देश संतप्त आहे. देशभरात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. मात्र, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून वाटेल ते बडबड करणारे, मुंबई पोलीस, महाराष्ट्राची बदनामी करणारे वाचाळवीर गप्पगार आहेत. गरीब मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचारावर काहीच बोलत नाहीत. जणू त्यांची वाचा गेली आहे.

ट्विटरवर ट्विट नाही की एका चॅनेलवर गलिच्छ आरडाओरड करणाराही गप्पच आहे. या वाचाळवीरांचा आवाज अचानक कोणी बंद केला? असा प्रश्न आता सामान्य जनता विचारत आहे. हाथरस प्रकरणावर संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. मात्र देशातील काही वाचाळवीर तोंडावर हात ठेवून गप्प बसून आहेत. त्यांची वाचा गेली कुठे, असाच जनतेचा सवाल आहे.

वाचाळवीरांनी सुशांतसिंह आत्महत्येनंतर काय ‘तारे’ तोडले होते ते वाचा…

• मुंबई पोलीस सुशांतला न्याय देणार नाहीत. हे प्रकरण सीबीआयकडे द्या.
-कंगना राणावत

• कंगना राणावतला घाबरायची गरज नाही. आमचा रिपब्लीकन पक्ष तिला संरक्षण देईल.
-रामदास आठवले

• सीबीआय आता निष्पक्ष तपास करेल. सुशांतच्या आत्म्याला शांती लाभेल.
-रविशंकर प्रसाद

• पब्लिक सेंटीमेंटमुळे सुशांतचा तपास सीबीआयकडे गेला पाहिजे.
-देवेंद्र फडणवीस

• तपास सीबीआयकडे दिला. आता सुशांतप्रकरणाला न्याय मिळेल.
-नितीशकुमार

• पाटणामध्ये नोंदविलेला एफआयआर योग्य होता हे सिद्ध झाले. मी खुश आहे.
-गुप्तेश्वर पांडे

उत्तर प्रदेशात काय घडले?

✓ हाथरस येथे एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. नराधमांनी तिची जीभही छाटली. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबियाना घरात डांबून रातोरात तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
✓ बलरामपूर कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला. रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
✓ भदोही येथील ११ वर्षांच्या एका दलित मुलीची हत्या करण्यात आली. त्या मुलीचं डोकं विटेने ठेचण्यात आले होते. माणुसकीला काळीमा फासणारीच ही घटना.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *