हा आहे पुणे विद्यापीठातील मुक्या प्राण्यांसाठी झटणारा अवलिया..!

| पुणे | कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे सर्वत्र हाहाकार उडवला आहे. त्यात लॉक डाऊन मुळे सगळे जनजीवन विस्कळित झाले आहे. सर्वसामान्य माणूस या परिस्थितीत पिचला गेला आहे, असे असताना सामान्यांसाठी अनेक राजकीय पक्षांकडून, समाजसेवी संस्थांकडून अन्नधान्य वाटप, जीवनावश्यक वस्तू वाटप आदी बाबी करण्यात आल्या. परंतु लॉक डाऊनच्या काळात बऱ्याच ठिकाणी मुक्या प्राण्यांचे मात्र अन्नाअभावी हाल झाले.

परंतु, पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठातील एका अवलीयांने मात्र विद्यापीठातील १४०-१५० कुत्रे व मांजरी यांच्यासाठी स्वतः या कठीण काळात घरी न जाता विद्यापीठात राहूनच तब्बल दोन महिन्याहुन अधिक काळ सांभाळले. दरम्यान विद्यापीठातील वसतिगृहात राहणारे विद्यार्थी आणि पुणे विद्यापीठात फेरफटका मारायला येणारे नागरिक हे या प्राण्यांसाठी इतर वेळेस खाद्य देत असत, परंतु लॉक डाऊन मुळे नागरिकांचा फेरफटका बंद झाला तर विद्यार्थी आपल्या गावी गेले त्यामुळे या प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली होती.

या भयानक परिस्थिती वसतिगृहातील जवळपास सर्व विद्यार्थी आपल्या गावी गेले असताना, एक अवलिया फक्त या प्राण्यांसाठी वसतिगृहात थांबला आणि फक्त थांबला नाही तर आपल्या मित्रांकडून पैसे गोळा करून या प्राण्यांच्या खाद्याची सोय केली. हा अवलिया विद्यार्थी आहे तत्वज्ञान विभागात पी. एच. डी. करणारे महेंद्र होनवडजकर..!

हा अवलिया अविरत ही मोहीम राबवत आहे. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यांच्या या अभिनव कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *