| मुंबई | आपल्याला माहीत आहे की, वाहन चालवताना आपल्याला विविध कागदपत्रे सोबत बाळगावी लागतात. पण आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स , रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, इन्श्युरन्स, पोल्यूशन सर्टिफिकेट ( PUC)यांसारखी कागदपत्रे जवळ ठेवण्याची गरज लागणार नाही. केंद्र सरकारने मोटर वाहन नियम १९८९ मध्ये केलेल्या विविध संशोधनासंदर्भात अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग विभागाने यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये मोटर वाहन नियमांमध्ये महत्त्वाचे बदल आहेत.
यानुसार, १ ऑक्टोबरपासून ड्रायव्हिंग लायसन्स आणि ई-चलानसह वाहनाच्या कागदपत्रांची नोंद माहिती तंत्रज्ञान पोर्टलद्वारे केली जाणार आहे. परवाना रद्द करणे, ई-चलान नोंदणी यांसारखी सर्व कामे इलेक्ट्रॉनिक पोर्टलद्वारे केली जातील. १ ऑक्टोबरपासून पोर्टलच्या माध्यमातून वाहनांसंदर्भातील डॉक्यूमेंट आणि ई चलानची माहिती वाहतूक विभागाकडे साठवली जाईल आणि वेळोवेळी अपडेट होईल. यासाठी डिजिटल कागदपत्रांची आरटीओकडून पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. त्यानंतर डिजीटल कागदपत्रे सोबत ठेवण्यास चालकाला परवानगी असेल.
वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर केला जाऊ शकतो, परंतु हा केवळ मार्ग शोधण्यासाठी, नेव्हिगेशनसाठीच असावा. तसेच, यावेळी वाहन चालवताना लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी. चालकांनी दिलेल्या नेव्हिगेशनसाठी मोबाईलचा वापर कसा करायचा याची नियमावलीही मंत्रालयाने दिली आहे. यामध्ये मोबाईल फोन गाडीच्या डॅशबोर्डला लावणं बंधनकारक असणार आहे, ज्यामुळे ड्रायव्हरचे लक्ष विचलित होणार नाही. मोबाईल फोन हातात घेऊन नेव्हिगेशनसाठी वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. आयटी सेवांचा वापर आणि इलेक्ट्रॉनिक देखरेखीमुळे वाहतुकीचे नियम पाळण्यास मदत होईल आणि यामुळे वाहनचालकांना त्रास देण्याचे प्रकारही थांबतील असा विश्वास यावेळी मंत्रायलयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .