३१ ऑक्टोबर : सरकारी कर्मचारी चळवळीतील काळा दिवस..!

१ नोव्हेंबर २००५ रोजी राज्य शासनाने एक शासन निर्णय काढून २००५ नंतर सेवेत येणाऱ्या बांधवांची पेन्शन हिरावून घेतली. पेन्शन कसली कवचकुंडलेच काढून घेतली. शासकीय सेवेत आल्यानंतर आपणास जे स्थेर्य मिळते ते म्हणजे आपल्या पश्चात आपल्या कुटुंबास आधार देणारी कुटुंब निवृत्ती वेतन योजना पण शासनाने नवीन व जुन्या कर्मचाऱ्यांत बुद्धीभेद निर्माण करून पेन्शन रुपी राक्षस कर्मचाऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यावर केव्हा बसवला हे कळलेच नाही.

२००५ ते २०१५ पर्यंत प्रत्येक जण आपल्या भविष्याबद्दल अनभिज्ञ होता पण त्याच्या मनातील भविष्या बद्दल अस्वस्थता होती, त्याच्या मनातील भीती शंका व अपुरे ज्ञान एकट्यात न ठेवता २००५ नंतरचे तरुण समोर आले व त्यांनी २००५ नंतर च्या सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना निर्माण करून आपणच आपल्या न्याय्य हक्कासाठी लढले पाहिजे ही जिद्द सर्व कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण करून त्यांच्यावर नक्की कुठे व कसा अन्याय होतो आहे याची जाणीव करून देऊन मुंबई नागपूर विभाग विभागावर मोठमोठी आंदोलने काढले. जिल्हा तालुका प्रत्येक ठिकाणी पेन्शनचा जागर केला पण कुंभकर्ण निद्रेत असलेल्या मायबाप सरकारला या युवकांचा आवाज आला नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्षित केला. त्यांच्यासाठी ही योजना असेल, पण २००५ नंतर जे कुटुंब आपल्या घरातील कर्ता गेल्यानंतर काय वेदना संघर्ष करावा लागतो हे त्यांनाच विचारा. संपूर्ण परिवार फार होरपळून निघत आहे, पण सरकारने यात पण राजकारण केले दहा वर्षात मरा व दहा लाख मिळवा असे आता मरण सुद्धा स्वस्त झाले आहे.

पेन्शन लढ्यात संघर्ष चालूच आहे व चालूच राहील पण आजच ३१ ऑक्टोबर रोजी बाळासाहेब शिंदे सर यांच्या चितेस मुखग्नी दिली. प्रत्येक लढ्यात हा पेन्शन योद्धा खंबीरपणे आपल्या सोबत होता पण आता तो शांत झाला आहे. कारण नियतीने त्याला आपल्या पासून हिरावून घेतले आहे पण त्याच्या परिवारास न्याय देण्यासाठी व आपल्या उज्वल भविष्यासाठी संघर्ष करावाच लागेल व तो संघर्ष खूप मोठा असेल. त्यामुळे परत आता पेटून उठावे लागेल व आपल्या हक्कासाठी व आज आपल्यात आपल्या सोबत नसणाऱ्या आपल्याच बांधवांच्या परिवारासाठी पुन्हा एकदा मैदानात युद्ध करावे लागेल चला तर मग आणि मनाशी ठरवून म्हणा ” हम होंगे कामयाब ” …

गोविंद उगले, महासचिव, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *