जागर इतिहासाचा : भाग १ – स्वराज्यात चोरीचा तपास लावण्याची पद्धत..

एखाद्या ठिकाणी चोरी करण किंवा दुसर्‍याची वस्तू चोरू आपली किंवा आपल्या कुटुंबाची छोट्या मोठ्या गरजा भागवणे. ही परंपरा कधी सुरू झाली हे कोणी ठामपणे सांगू शकत नाही. पण मनुष्य हा प्राणी पृथ्वीतलावरच्या इतर प्राण्यांपेक्षा बुद्धिमान आहे. ज्या वेळे पासून मनुष्यप्राण्याने समूह किंवा वस्ती स्थापन करून कौटुंबिक जीवन पद्धत जगू लागला. माझ्यामते तेव्हापासून मनुष्य प्राणी हा इतर ठिकाणी चोरी करून आपल्या व आपल्या कुटुंबाच्या छोट्या मोठ्या गरजा भागवत असे. वेगवेगळ्या कालखंडामध्ये मनुष्य अनेक ठीक-ठिकाणी आणि वेगवेगळ्या पद्धतीने चोरी केली किंवा चोरी करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळ्या देशांमध्ये या गुन्ह्याला आळा घालण्यासाठी किंवा गुन्हेगार पकडण्यासाठी वेगवेगळ्या देशांचे त्यांचे कायदे व नियम आणि गुन्हेगारास शिक्षा त्यांच्या त्यांच्या देशाप्रमाणे नियम असत. असेच काही नियम स्वराज्य मध्ये पण होते. गुन्हेगार पकडण्यासाठी ही आजच्या वर्तमान काळापेक्षा त्या काळाचे नियम फार वेगळे होते आणि तेवढेच गमतीशीर पण होते. स्वराज्य मध्ये कोठे काही चोरीचे प्रकरण किंवा चोरीचे गुन्हे झाले असेल तर गुन्हेगार पकडण्यासाठी काही नियम किंवा परंपरा अवलंबून करत असतात किंवा त्यांचा वापर करतात.

आजच्या वर्तमान काळानुसार पोलीस, पोलीस स्टेशन, वकील, न्यायालय किंवा जज असा काही प्रकार त्या काळात नव्हता. किंवा आजच्या वर्तमान काळात जो त्रास होत असेल. (उदा. पोलिसांची उलट-सुलट प्रश्नांची उत्तरे देऊन वैताग येणे, पोलीस स्टेशनचे सारखे सारखे हेलपाटे मारणे) घरामधील चोरी घडलेल्या चा मानसिक त्रास तर होतोच आणि वरून हा अजून एक मानसिक त्रास होतो. हे आपणा सर्वांना माहीत आहे आज वर्तमान काळामध्ये घरामध्ये चोरीची घटना घडली त्याच्यापेक्षा त्रासदायक घडलेला चोरीचा तपास लावणे किंवा गुन्हेगार याचा तपास घेणे हे काम त्या घडलेल्या चोरी पेक्षा जास्तच त्रासदायक आणि मानसिक त्रास होतो हे आपण सर्व जाणून आहोत.

पण इतिहासामध्ये असे काही नव्हते किंवा अशा काही नोंदणी सापडत नाहीत. इतिहासामध्ये काही अशी नोंदणी किंवा पत्र आहेत. ज्यामध्ये घडले चोरी त्याचा तपास लावणे आणि गुन्हेगाराचा तपास लावणे. त्याची पद्धत काही ठिकाणी नोंद करून ठेवली आहे. असेच काही नोंदणी मला पानसे घराण्याचा इतिहास या पुस्तकाचे वाचन करताना मला समजले.

चोरीचा तपास लावण्यात गुन्हेगार पकडण्यासाठी ची पद्धत वापर करायचे. ही पद्धत किती जुनी आहे याचा काही ठोस पुरावा मला अजून तरी नाही सापडला. ही पद्धत छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या काळापासून आहे किंवा त्यांच्या आधीपासून आहे. हे सांगणे अवघड आहे. पानसे घराण्याचा इतिहास हा पेशवाई मध्ये जास्त उदयास आला त्यामुळे ही पद्धत पेशवाईमध्ये वापर करत असत ते ठामपणे सांगू शकतो. तर आता आपण घडलेली चोरीचा तपास कसे लावत असते आणि चोरी केलेल्या गुन्हेगाराला कसे पकडतात असे आता आपण पाहू.

स्वराज्य मध्ये ज्या व्यक्तीच्या घरी चोरी घटना घडायची. तर त्या घराचा मालक घडलेली घटना सर्व हकीकत. त्या गावाचा नेमलेल्या मुकादमा( पाटील ).
(इतिहासामध्ये प्रत्येक गावावर एक किंवा दोन पाटील अशा माणसांचे नियुक्ती करायची आणि तो नेमलेला पाटील त्या गावाची पूर्णपणे व्यवस्था राखायचा. उदाहरण गावातील लोकांचे दरोडेखोरांनी पासून रक्षण करणे. गावातील गुन्हेगारी कमी करणे. स्थानिक पातळीवर न्याय निवाडे करणे. असे काही जबाबदारीचे काम त्या नेमलेल्या पाटील वर असे). त्या
ज्या व्यक्तीच्या घरी चोरी घडली आहे. त्या घराचा मालक गावचा मुकादम याला खबर देत असत किंवा तक्रार करत असत. तर मुकादम (गावचा पाटील) गावातील नेमलेल्या रखवालदार यांना बोलावून घडलेली घटना सर्व समजून सांगत असत आणि या रखवालदाराला दोन जबाबदाऱ्या देण्यात येत. त्या जबाबदाऱ्या पुढील प्रमाणे. ज्याठिकाणी चोरीची घटना घडलेली आहे तेथे जाऊन पंचनामा करून पुढील तपास चालू करायचा. ही ती पहिली जबाबदारी आणि दुसरी जबाबदारी म्हणजे ( खरं तर ही जबाबदारी म्हणण्यापेक्षा बळजबरीने शिक्षा देणे असे बोलले तरी चांगलं.) नेमलेल्या रखवालदार दुसरी जबाबदारी म्हणजे. जर कोणत्याही प्रकारे घडलेल्या चोरीचा गुन्हेगार सापडत नसेल. कोणत्या कारणाने तो चोर सापडला नाही तर त्या नेमलेल्या रखवालदाराना. ज्या व्यक्तीच्या घरी चोरी घडलेली आहे. त्या व्यक्तीला घरामध्ये जी वस्तू चोरीला गेली आहे. ती वस्तू त्या व्यक्तीला भरून देणे ( स्वतःच्या पैशातून ती वस्तू आणून देणे. कल्पना करा सोन्याचे दागिने चांदीचे दागिने हे जर त्या व्यक्तीच्या घरातून चोरीला गेले असेल. गावातले नेमले रखवालदार यांना त्या वस्तू आपल्या स्वतःचे पैसे खर्च करून त्या व्यक्तीला ती वस्तू भरून देणे. म्हणून मी हे जबाबदारी म्हणण्यापेक्षा बळजबरीने शिक्षा देणे असे बोलणे योग्य वाटेल.)

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल. त्या काळात चोर चोरी करून परत सापडत असत का? रखवालदार यांना आपल्या पैशातून भरपाई करून द्यावे लागत असेल का? या सर्व गोष्टी पुढील भागात सांगणार आहे…

संदर्भ:
पानसे घराण्याचा इतिहास.
लेखक केशव रंगनाथ पानसे

– मोहित मधूकर पांचाळ, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *