माझे आयुष्यभर पाहिलेले स्वप्न पूर्ण – लालकृष्ण अडवाणी

| नवी दिल्ली | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी व्हिडिओ संदेश जारी केला आहे. ते म्हणाले, माझ्या मनातील स्वप्नाची पूर्ती होत आहे. हा दिवस सर्व भारतीयांसाठी ऐतिहासिक आहे. आडवाणी म्हणाले, कधी-कधी एखाद्याच्या जीवनात महत्वाचे स्वप्न पूर्ण व्हायला फार वेळ लागतो. मात्र, जेव्हा शेवटी त्याला समजते, तेव्हा प्रतीक्षा सार्थक होते. असेच एक स्वप्न, माझ्या हृदयाजवळ आहे, जे आता पूर्ण होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणीसाठी भूमिपूजन केले. खरे तर हा केवळ माझ्यासाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठीच ऐतिहासिक आणि भावनात्मक दिवस आहे. एवढेच नाही, तर राम जन्मभूमीवर भव्य राम मंदिर उभारणे हे भारतीय जनता पक्षाचे मिशन राहिले आहे, असेही आडवाणी म्हणाले.

रथ यात्रेचीही आठवण –
आडवाणी म्हणाले, राम जन्मभूमी आंदोलनादरम्यान, १९९० मध्ये ‘सोमनाथ से अयोध्या तक’ राम रथ यात्रेच्या रूपात मी एक महत्वाचे कर्तव्य पार पाडले. ज्यामुळे अनेक लोकांच्या आकांक्षेला, उजेर्ला आणि त्यांच्या उत्तक भावनेला बळकटी मिळाली, असे मला वाटते.

आडवाणी म्हणाले, राम जन्मभूमी आंदोलनात बहुमूल्य योगदान आणि बलिदान देणा-या भारत आणि जगातील संत, नेते आणि लोकांप्रती मी आभार व्यक्त करू इच्छीतो. नोव्हेंबर २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राम मंदिराच्या उभारणीला शांततामय वातावरणात सुरू होत आहे. याचाही मला आनंद वाटतो. यामुळे, भारतीयांतील संबंध अधिक दृढ व्हायला मदत होईल, असेही आडवाणी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *