सेनेचे “ठाणे”दार केरळात..! पालकमंत्र्यांसह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात डॉक्टरांची टीम देखील रवाना…!

Eknath
 केरळ राज्यावर आलेल्या महापुराच्या अस्मानी संकटाने केरळचे कंबरडे मोडले आहे. पाण्याने संपूर्ण राज्यच गिळंकृत केल्यासारखी परिस्थिती केरळात आहे. यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याच आवाहन केरळातून होत असताना त्याला वेगवेगळ्या पक्ष, संस्था, सेलेब्रिटी आदींनी भरघोस मदत केली आहे. या केरळमधील पूरग्रस्तांसाठी ठाणे शिवसेनेने देखील आपला हात पुढे केला आहे.
       शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या चित्र प्रदर्शनासोबत सर्व आमदार-खासदार, मुंबई-ठाणे नगरसेवक आपले मानधन केरळसाठी देणार असल्याचे जाहीर केले. या सोबतच ठाणे जिल्हा शाखेने नेहमीप्रमाणे समाजासाठी “काहीही” ही आपली दिघे साहेबांपासून सुरू असलेली परंपरा पालकमंत्री शिंदे साहेबांनी आजपर्यंत सुरू ठेवली आहे. ठाणे जिल्हा सेनेची टीम महाराष्ट्रात आदर्शवत टीम असल्याचे सगळेच जाहीर कबूल करतात. त्याच स्वभावाला अनुसरून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार बालाजी किणीकर, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह ५० डॉक्टरांचे पथक कपडे, चादरी, साबण, तांदूळ, डाळ, साखर, बिस्कीट पुडे आदी वस्तूंचा समावेश असलेले सुमारे ५० टन सामान घेऊन केरळच्या दिशेने सायंकाळी रवाना झाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *