| नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी | कोरोना विषाणूचा हवेतून प्रसार होत असल्याच्या पुराव्यांना नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. त्यामुळे मास्क घालणे सर्वांना अनिवार्य करायला हवे, असे कौन्सिल ऑफ साईन्टिफिक अॅन्ड इंडस्ट्रीयल रिसर्च (CSIR) संस्थेच्या महासंचालकांनी म्हटले आहे.
मास्क घालणे सर्वांना अनिवार्य हवे. जेव्हा तुम्ही बंद खोलीत असता तेव्हाही मास्क घालायला हवे. तुमच्या ऑफिसमध्ये हवा खेळती असायला हवी. तुम्ही बंद जागेत असाल तर तेथे हवा येईल, अशी व्यवस्था करा. जर खुल्या जागी असाल तर मास्क घाला आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळा, असे डॉ. मांडे यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रसार हवेतूनही होत असल्याच्या पुराव्याला जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृत दुजोरा दिला आहे. यासंबंधी २३९ शास्त्रज्ञांनी WHO ला एक पत्र पाठविले होते. कोरोनाचा प्रसार हवेतील पाण्याच्या लहान थेंबांनीही होऊ शकतो, त्यामुळे उपाययोजना करण्याची विनंती शास्त्रज्ञांनी केली होती. जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्या तोंडातून ५ मायक्रॉनपेक्षा कमी आकाराचे एरोसोलस (सूक्ष्म पाण्याचे थेंब) बाहेर पडत असतात. ते हवेमध्ये तरंगत असतात. गर्दीच्या ठिकाणी जर कोणी कोरोना बाधित व्यक्ती असेल तर सुक्ष्म पाण्याच्या थेंबाद्वारे दुस-यांनाही संसर्ग होऊ शकतो. बंद खोलीतही हवेत तरंगणा-या लहान थेंबाद्वारे संसर्ग होण्याचा धोका आहे, असे डॉ. मांडे म्हणाले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .