हा महाराष्ट्र केडर मधील अधिकार थेट संयुक्त राष्ट्र संघात समन्वयक पदी

| मुंबई | अतिरिक्त मुख्य सचिव (नगरविकास व जलसंपदा) प्रवीण परदेशी यांची संयुक्त राष्ट्रसंघात नियुक्ती झाली असून, केंद्र सरकारने परदेशी यांच्या परदेशातील सेवेस मान्यता दिली.

परदेशी हे संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर जात असल्याने त्यांच्या परदेशातील सेवेस मान्यता द्यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे पाठविला होता. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्त विषयक समितीने परदेशी यांच्या संयुक्त राष्ट्रसंघातील ११ महिन्यांच्या प्रतिनियुक्तीस मान्यता दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रशिक्षण आणि संशोधन विभागात आंतरराष्ट्रीय कार्यक्रम विभागाचे समन्वयक म्हणून परदेशी यांची नियुक्ती झाली आहे. जिनीव्हामध्ये परदेशी यांचे कार्यालय असेल. केंद्राच्या मान्यतेनंतर परदेशी यांना राज्याच्या सेवेतून तात्काळ कार्यमुक्त करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाच्या सेवेत लगेचच रुजू होणार असल्याचे परदेशी यांनी सांगितले. लातूर भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम यशस्वीपणे केल्यानंतर परदेशी यांनी सात वर्षे संयुक्त राष्ट्रसंघात नैसर्गिक आपत्तीनंतरचे पुनर्वसन या महत्वाच्या क्षेत्रात काम केले होते. प्रवीण परदेशी यांना राज्याच्या सेवेतून कार्यमुक्त करण्यात आल्यावर राज्य शासनाने नगरविकास विभागाच्या सचिवपदी अतिरीक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची नियुक्ती केली.

तीन अधिकारी सचिवपदी :
राज्याच्या सेवेतील अपूर्व चंद्र, अरविंद सिंग आणि डॉ. संजय चहांदे हे तीन अधिकारी केंद्र सरकारमध्ये सचिव पदासाठी पात्र ठरले आहेत. यापैकी अपूर्व चंद्र आणि सिंग हे सध्या केंद्राच्या सेवेत प्रतिनियुक्तीवर आहेत. डॉ. चहांदे हे मंत्रालयात अतिरिक्त मुख्य सचिवपदी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *