१० वीचा भूगोलाचा पेपर होऊ शकतो रद्द..!


पुणे : दहावीच्या पाच विषयांचे पेपर होउन आता २० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून लॉकडाउन अन्‌ कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल विषयाचा पेपर रद्द करावा, अशी मागणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्याचा निर्णय झाला असून लवकरच त्यावर अंतिम निर्णय होईल, असे बोर्डाच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. राज्यातील १८ लाखांहून अधिक विद्यार्थी २०१९-२० मध्ये दहावीची परीक्षा देत असून पाच विषयांचे पेपर लॉकडाउनपूर्वी संपलेले आहेत.

परीक्षा घ्यायची ठरली तर..!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण वर्गखोल्यात सॅनिटायझर तथा जंतूनाशकाची फवारणी करावी लागणार आहे. सर्व विद्यार्थी अन्‌ पर्यवेक्षकांना एन- 95 मास्क द्यावे लागणार आहेत. त्यात कोरोनाच्या भितीने बहूतांश पालकांनी आपल्या विद्यार्थ्याला पेपरला पाठवतील की नाही याची शंका आहे. लॉकडाउनमुळे घरातील वातावरण अभ्यासासाठी पोषक राहिले नसल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाल्याचेही चित्र पहायला मिळत आहे.

त्यामुळे पेपर रद्द होण्याचा निर्णय होऊ शकतो, असेही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समोर येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published.