ठरलं ..! या तारखेला लागणार १० वी, १२वी चा निकाल..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी HSC म्हणजेच बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर इयत्ता दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस जाहीर होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत दिली.

निकाल जाहीर करण्याची प्रक्रिया सध्या सुरु असून १५ जुलैपर्यंत बारावीचा आणि जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी दिली.

सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी निकालांची ताऱीख समोर आली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यायंवर चर्चा झाल्याचं कळत आहे. ज्यामध्ये सद्यपरिस्थिती पाहता ऑनलाइन शिक्षण, दहावी, बारावीचे निकाल, अकरावीची प्रवेश प्रक्रिया अशा विविध मुद्दय़ांवर प्रकाश टाकण्यात आला.

दरम्यान, जुलै महिन्याच्या अखेरीस दहावीचा निकाल जाहीर होणार असल्यामुळं अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी त्यानंतरच्या काही दिवसांतच महाविद्यालयीन प्रवेशप्रक्रिया सुरु होईल. ज्याअंतर्गत महाविद्यालयांची नोंदणी सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीनंच ही प्रक्रिया पार पडणार असल्याचं कळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *