| मुंबई | महाराष्ट्रात करोनाचे ३९४ नवे रुग्ण आढळले आहेत. तर मागील २४ तासात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या ६ हजार ८१७ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ३१० जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत ९५७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
394 new #COVID19 cases & 18 deaths have been reported in Maharashtra today, taking the total number of cases to 6817 & death toll to 310 in the state. A total of 957 patients have been discharged till date: Maharashtra Health Department
— ANI (@ANI) April 24, 2020
आज झालेल्या १८ मृत्यूंपैकी ११ मृ्त्यू मुंबईत, पाच पुण्यात तर दोन मालेगावमध्ये झाले आहेत. आज झालेल्या १८ मृत्यूंमध्ये १२ पुरुष रुग्ण तर सहा महिला रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या १८ रुग्णांपैकी नऊ रुग्ण हे ६० वर्षे वयाच्या वरचे होते. तर ६ रुग्ण हे ४० ते ५९ वर्षे या वयाचे होते. तर तीन रुग्ण हे ४० वर्षे वयाखालील होते. १८ पैकी १२ रुग्णांना हायपर टेन्शन, अस्थमा, हृदय रोग या आजारांची हिस्ट्री होती.
मुंबईत करोनाचे ३५७ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील रुग्णांची संख्या ४ हजार ५८९ इतकी झाली आहे. २४ तासात ११ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकट्या मुंबईत करोनाची लागण झाल्याने १७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. आत्तापर्यंत मुंबईतल्या ५९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.