#coronavirus- २५ एप्रिल आजची कोरोना आकडेवारी..!



| मुंबई |महाराष्ट्रात करोनाचे आज ८११ रुग्ण आढळले आहेत. गेल्या चोवीस तासात २२ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या आता ७ हजार ६२८ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन ३२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या काळजीत भर टाकणारीच ही बातमी ठरली आहे.

राज्यात आज ११९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत १०७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज राज्यात २२ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या २२ रुग्णांच्या मृत्यूंपैकी मुंबईत १३, पुण्यात ४, पुणे ग्रामीण भागात १, पिंपरी चिंचवडमध्ये १, मालेगावात १, धुळे शहरात १ तर सोलापूर शहरात १ मृत्यू झाला आहे.

२२ रुग्णांच्या मृत्यूंपैकी १६ पुरुष तर सहा महिला होत्या. ६० वर्षे वरचे वयावरचे ११ रुग्ण यामध्ये होते. ८ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातले होते. तर ३ रुग्ण हे ४० वर्षांखालील होते. २२ रुग्णांचे मृत्यू झाले त्यामधील १३ रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, क्षयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार होते. करोनामुळे आत्तापर्यंत महाराष्ट्रात ३२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या १ लाख ८ हजार ९७२ नमुन्यांपैकी १ लाख १ हजार १६२ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना निगेटिव्ह आले आहेत. तर ७ हजार ६२८ जणांचे नमुने करोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख २५ हजार ३९३ लोक होम क्वारंटाइन आहेत तर ८ हजार १२४ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *