#coronavirus_MH – ६ मे आजची आकडेवारी..!



| मुंबई | राज्यात आज कोरोनाच्या तब्बल 1233 नवीन रुग्णांची नोंद झाली असून आतापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,758 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 25 जण मुंबईचे तर पुण्यातील 3, अकोला शहरातील 3 आणि जळगाव, सोलापूर शहरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 651 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 275 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 1 लाख 90 हजार 879 नमुन्यांपैकी 1 लाख 73 हजार 838 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 16,758 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 11 हजार 112 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 13 हजार 107 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 3094 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 21 पुरूष तर 13 महिला आहेत. त्यातील 18 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 13 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 3 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 34 रुग्णांपैकी 27 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1048 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून एकूण 11,692 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 51.14 लाख लोकांचे सर्वेक्षण केले आहे.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हा रुग्ण बरे मृत्यू
मुंबई 10714 374 412
पुणे (शहर+ग्रामीण) 1964 125 115
पिंपरी चिंचवड मनपा 123   3
ठाणे (शहर+ग्रामीण) 629 36 10
नवी मुंबई मनपा 519   4
कल्याण डोंबिवली मनपा 247   3
उल्हासनगर मनपा 13   0
भिवंडी निजामपूर मनपा 21   2
मीरा भाईंदर मनपा 187   2
पालघर 36 1 1
वसई विरार मनपा 175   4
रायगड 60 5 1
पनवेल मनपा 115   2
नाशिक (शहर +ग्रामीण) 72 2 0
मालेगाव मनपा 391   12
अहमदनगर (शहर+ग्रामीण) 53 16 2
धुळे 32   3
जळगाव 65 1 12
नंदूरबार 19   1
सोलापूर 175   8
सातारा 89 3 2
कोल्हापूर 16 2 1
सांगली 35 27 1
सिंधुदुर्ग 4 1 1
रत्नागिरी 16 2 1
औरंगाबाद 373 14 11
जालना 8   0
हिंगोली 58 1 0
परभणी 2   1
लातूर 19 8 1
उस्मानाबाद 3 3 0
बीड 1   0
नांदेड 31   2
अकोला 83 1 9
अमरावती 73   10
यवतमाळ 92 8 0
बुलडाणा 24 8 1
वाशिम 1   0
नागपूर 182 12 2
भंडारा 1   0
गोंदिया 1 1 0
चंद्रपूर 4 1 0
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) 32   6
एकूण 16758 2819 65

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *