
| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार बनवणारी विधानपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. काँग्रेसने त्यांच्या एका उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यामुळे आता सगळे ९ उमेदवार विधानपरिषदेवर जाणार आहेत. पण सुरुवातीला काँग्रेस २ जागांवर ठाम असल्यामुळे महाविकासआघाडीत संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळालं. काँग्रेस दुसरा उमेदवार उभा करणार असेल, तर आपण निवडणुकीला उभे राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याने काँग्रेसने उमेदवार मागे घेतल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी विधानपरिषदेची निवडणूक जाहीर व्हावी, यासाठी नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जाऊन शिष्टाई केली होती. नार्वेकर यांनी दोनदा बाळासाहेब थोरात यांच्याशीही चर्चा केली.
बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेला निर्वाणीचा निरोप थोरातांना दिला. आज अखेर काँग्रेसचे दिल्लीतील नेते अहमद पटेल आणि वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हायचा मार्ग सुकर झाला.
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री