मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होणार बिनविरोध आमदार..!
मिलिंद नार्वेकर यांची शिष्टाई आली कामी..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आमदार बनवणारी विधानपरिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध होणार आहे. काँग्रेसने त्यांच्या एका उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यामुळे आता सगळे ९ उमेदवार विधानपरिषदेवर जाणार आहेत. पण सुरुवातीला काँग्रेस २ जागांवर ठाम असल्यामुळे महाविकासआघाडीत संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळालं.  काँग्रेस दुसरा उमेदवार उभा करणार असेल, तर आपण निवडणुकीला उभे राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्याने काँग्रेसने उमेदवार मागे घेतल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यापूर्वी विधानपरिषदेची निवडणूक जाहीर व्हावी, यासाठी नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जाऊन शिष्टाई केली होती. नार्वेकर यांनी दोनदा बाळासाहेब थोरात यांच्याशीही चर्चा केली.

बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंनी दिलेला निर्वाणीचा निरोप थोरातांना दिला.  आज अखेर काँग्रेसचे दिल्लीतील नेते अहमद पटेल आणि वेणूगोपाल यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. यानंतर विधानपरिषद निवडणूक बिनविरोध व्हायचा मार्ग सुकर झाला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *