| मुंबई | भायखळा परिसरात कोरोनाचे थैमान सुरू असताना कोणतीही कल्पना न देता कार्यालयात गैरहजर राहिल्यामुळे १० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. वरळी पाठीमागे भायखळा परिसरातही मोठय़ा संख्येने नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे विभाग कार्यालयाने प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी कंबर कसली आहे.
काही कर्मचारी कोणतीही सूचना न देता कार्यालयात येत नसल्यामुळे त्यांना साहाय्यक आयुक्तांनी निलंबित केले. या प्रकरणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दि म्युनिसिपल युनियनने याविरोधात आवाज उठविला आहे. कर्मचाऱ्यांना निलंबित आणि बडतर्फ करणाऱ्या साहाय्यक आयुक्तांना बडतर्फ करावे, अशी मागणी युनियनने केली आहे.
या संदर्भात साहाय्यक आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काही कर्मचारी दुरून येतात. त्यांना सवलतही दिली जाते. पण काही कर्मचारी कोणतीही सूचना न देता व रजेसाठी अर्ज सादर न करताच वारंवार अनुपस्थित राहात आहेत. सध्या कोरोनाच्या संसगार्साठी मोठय़ा प्रमाणावर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत कर्मचारी अनुपस्थित राहात आहेत. वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली आहे. दहा जणांना निलंबित करण्यात आले होते. त्यापैकी पाच जण कार्यालयात हजर झाले. त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा