| मुंबई | गुगलचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅप Google Meet आता जीमेलद्वारे मोफत वापरता येणार आहे. गेल्या महिन्यात कंपनीने Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जीमेलद्वारेच Google Meet चा वापर करता येणारे एक नवीन फीचर कंपनीने रोलआउट करण्यास सुरूवात केली. आता हे फीचर सर्व युजर्सच्या जीमेल अकाउंटमध्ये उपलब्ध झाल्याची माहिती गुगलकडून देण्यात आली आहे.
करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने घरबसल्या व्हिडिओ कॉलिंग फीचर असलेल्या अॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय. हे ओळखून कंपनीने गेल्या महिन्यात Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध केलं. आतापर्यंत हे अॅप केवळ G Suite च्या ग्राहकांना तेही केवळ व्यावसायिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी उपलब्ध होते. त्यासाठीही पैसे आकारले जायचे. पण, आता हे अॅप जीमेलद्वारे सर्वांना मोफत वापरता येणार असून याद्वारे एकाच वेळी १०० जणांना व्हिडिओ कॉल करता येणार आहेत.
कसा करायचा वापर? :-
- आता कोणालाही व्हिडिओ कॉल करण्यासाठी वेगळं Google Meet अॅप ओपन करायची गरज नाही. तुम्ही जीमेलद्वारेच व्हिडिओ कॉल करु शकाल.
- यासाठी GMail अकाउंट ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला हँगआउट्स चॅटच्या वरती ‘Meet’ हा नवा पर्याय मिळेल. यावर क्लिक करुन युजर त्यांच्या गरजेनुसार Join a meeting किंवा Start a meeting हा पर्याय निवडू शकता.
- ज्या युजर्सच्या जीमेलमध्ये डाव्या बाजूला ‘Meet’ हा नवा पर्याय उपलब्ध नसेल. त्यांनी उजव्या बाजूला असलेल्या जीमेल अॅप्स पर्यायवर क्लिक केल्यास तिथे हा पर्याय दिसेल.
- वेब अॅक्सेसव्यतिरिक्त iOS युजर्स आणि अँड्रॉइड या दोन्ही युजर्ससाठी हे अॅप मोफत उपलब्ध असेल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. अॅप स्टोअर आणि प्ले स्टोअरमधून Google Meet डाउनलोड करता येईल. Google Meet चा वापर करण्यासाठी युजरचं गुगल अकाउंट असणं गरजेचं आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा