| मुंबई | मुंबईमधील कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावी येथे नियुक्त करण्यात आलेल्या ३७ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका ५७ वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा (एएसआय) करोनासंसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये करोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आठवर पोहचली आहे. राज्यभरात करोनामुळे ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या शनिवारी ,१६ मे पर्यंत एक हजार १४० वर पोहचली आहे. या पैकी ९४९ कर्मचारी हे पोलीस हवालदार असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात करोनाचा लागण झाल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी एक भावनिक ट्विट केलं आहे.
For a true policeman, ‘Duty before self’ is a way of life!
— Mumbai Police (@MumbaiPolice) May 16, 2020
One of the recent posts on the personal profile of Late API Amol Kulkarni, who made the highest sacrifice in the fight against #coronavirus
We pray for his soul to rest in peace. pic.twitter.com/hObQIeX6BJ
कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये अमोल कुलकर्णी या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निधनानंतर त्यांच्या प्रोफाइलवर त्यांनीच पोस्ट केलेला हा जुना फोटो पोलिसांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. “खऱ्या पोलीस कर्मचारी ‘स्वत:पेक्षा कर्तव्य महत्वाचे या ध्येयानेच जीवन जगतात.” मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये काही पोलीस कर्मचारी दिसत असून, त्यावर ‘कोणी पाच कोटी दिलेत कोणी पाचशे कोटी दिलेत आम्ही आमचं आयुष्य देतोय’ अशी ओळ लिहिण्यात आली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सर्वोच्च बलिदान देणारे दिवंगत एपीआय अमोल कुलकर्णी यांच्या खासगी प्रोफाइलवरील ही पोस्ट. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच प्रार्थना,” असे कॅप्शन या फोटोला पोलिसांनी दिले आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा