…. आम्ही आमचं आयुष्य देतोय , मुंबई पोलिसांचे भावनिक ट्विट..!

| मुंबई | मुंबईमधील कोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या धारावी येथे नियुक्त करण्यात आलेल्या ३७ वर्षीय सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) आणि एका ५७ वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा (एएसआय) करोनासंसर्गामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये करोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेल्या पोलिसांची संख्या आठवर पोहचली आहे.  राज्यभरात करोनामुळे ११ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या शनिवारी ,१६ मे पर्यंत एक हजार १४० वर पोहचली आहे. या पैकी ९४९ कर्मचारी हे पोलीस हवालदार असल्याची माहिती समोर आली आहे.  पोलीस कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात करोनाचा लागण झाल्याची आकडेवारी समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी एक भावनिक ट्विट केलं आहे.

कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये अमोल कुलकर्णी या सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे निधनानंतर त्यांच्या प्रोफाइलवर त्यांनीच पोस्ट केलेला हा जुना फोटो पोलिसांनी ट्विटरवरुन शेअर केला आहे. “खऱ्या पोलीस कर्मचारी ‘स्वत:पेक्षा कर्तव्य महत्वाचे या ध्येयानेच जीवन जगतात.” मुंबई पोलिसांनी केलेल्या ट्विटमध्ये काही पोलीस कर्मचारी दिसत असून,  त्यावर ‘कोणी पाच कोटी दिलेत कोणी पाचशे कोटी दिलेत आम्ही आमचं आयुष्य देतोय’ अशी ओळ लिहिण्यात आली आहे.  कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सर्वोच्च बलिदान देणारे दिवंगत एपीआय अमोल कुलकर्णी यांच्या खासगी प्रोफाइलवरील ही पोस्ट. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो हीच प्रार्थना,” असे कॅप्शन या फोटोला पोलिसांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *