| मुंबई | आज राज्यामध्ये २४ तासात कोरोनाच्या रुग्णांमध्ये धक्कादायक वाढ झाली आहे. आज राज्यामध्ये कोरोनाचे तब्बल २,३४७ रुग्ण वाढले आहेत. एका दिवसातली रुग्णवाढीची ही आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. तर मुंबईमध्येही कोरोनाचे १,५९५ रुग्ण वाढले आहेत. आज दिवसभरात राज्यात ६३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्रात आता कोरोनाचे एकूण ३३,०५३ रुग्ण आहेत. आजच्या एका दिवसात कोरोनाचे ६०० रुग्ण बरे होऊन घरी गेले, यामुळे राज्यात आता बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७,६८८ एवढी झाली आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ११९८ झाली आहे.
राज्यात आज झालेल्या ६३ मृत्यूंपैकी मुंबईत ३८, पुण्यात ९, औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १,लातूर मध्ये १, तसेच अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये ( ६५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
मुंबईमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे २०,१५० रुग्ण आहेत, तर आत्तापर्यंत ७३४ जणांचा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा