| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे शाळा सुरू करता आल्या नाहीत तरी शिक्षण सुरूच राहिले पाहिजे. त्यादृष्टीने तज्ज्ञांशी चर्चा करून ‘ई लर्निंग’च्या माध्यमातून शिक्षण पद्धतीचा सर्वंकष आराखडा तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा आढावा घेतला. या बैठकीत मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, शाळा सुरू होणार नाहीत. पण शिक्षण सुरूच राहील, असे नियोजन करणे आवश्यक आहे. ऑनलाईन-शिक्षण, डिजिटल माध्यमाच्या पर्यायांचा विचार करावाच लागेल. विशेषत: कंटेन्मेंट झोनमधील शाळा बंद राहतील. ग्रीन झोन मध्ये सुरु करता येतील. पण झोनची परिस्थिती बदलली तर अडचणी निर्माण होतील. महापालिका क्षेत्रांमध्ये ग्रीन झोन कमी आहेत. त्यामुळे हा मोठा प्रश्न आहे. शहरात इंटरनेट सेवा उपलब्ध असते. त्यामुळे या ठिकाणी ऑनलाईन, व्हर्च्युअल क्लासरूम्स पर्याय वापरता येईल. ग्रामीण भागात ग्रीन झोन जास्त आहेत. पण त्याठिकाणी वेगवान इंटरनेट सेवा उपलब्ध करावी लागेल, असेही त्यांनी सांगितले.मुख्य सचिव मेहता यांनी कोरोनाच्या नियमांचा पालन करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरु होईल, असे गृहीत धरून नियोजन करण्याचे निर्देश दिले. यावेळी, राज्यात ७५० शाळांत व्हर्च्युअल शिक्षण सुरु असल्याची माहिती वंदना कृष्णा यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी अंतिम वर्ष वगळून अन्य वर्षातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात दाखल करण्याच्या तसेच प्रथम वर्ष प्रवेशाच्या नियोजनाची माहिती दिली. सीईटीच्या परीक्षांसाठीही तयारी करण्यात येत असल्याचे सांगितले.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा