| मुंबई | कोरोनाच्या संकटाचा परिणाम जगभरात दिसून येत आहे. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. देशात गुंतवणूक अत्यंत कमी झाली आहे. तसेच अनेक राज्यांत औद्योगिक उत्पादन बंद झाले आहे. लाॅकडाऊन कालावधीत मागणी आणि उत्पादन दोघांतही कमतरता आली. याचा परिणाम हा अर्थव्यवस्थेवर झाला आहे. पुढील तीन महिने महागाई कायम राहणार असून त्यापुढील सहा महिन्यात महागाई कमी होईल, असे सांगत रेपो रेटमध्ये ०.४ टक्के कपात करण्यात आली आहे, अशी माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिली.
यंदा मान्सून चांगला होण्याचा अंदाज आहे. देशात गुंतवणूक अत्यंत कमी झाली आहे. वीज आणि पेट्रोलियम वापरात कमतरता आली आहे. तर मार्चमध्ये सिमेंटचे उत्पादन १९ टक्क्यांनी कमी झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ०.४ बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी दिली. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलास मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज सकाळी रेपो रेट संदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. रेपो रेटमध्ये ४० बेसिक पॉईंटची कपात करण्यात आली आहे. रेपो रेट आता ४.४ टक्क्यावरुन ४ टक्के करण्यात आला आहे.- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री