देशात कोरोना बधितांचा आकडा लाखापार..!

| नवी दिल्ली | देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाबाधितांचा आकडा एक लाख १८ हजार ४४७ वर पोहोचला आहे. देशात कोरोनामुळे ३ हजार ५८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४८ हजार ५३४ रुग्ण एकदम ठणठणीत झाले आहेत. तर ६६ हजार ३३० जणांवर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५२ लाख ९८ हजार १९७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे जगभरातल्या ३ लाख ३९ हजार ४१८ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेत. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २१ लाख ५६ हजार २८८ इतकी आहे..

देशातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत काल ६ हजार ८८ इतकी विक्रमी वाढ झाली. देशातली एकूण रुग्णसंख्या १ लाख १८ हजार ४४७ झाली असून ६६ हजार ३३० जणांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासांत १४८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३ हजार ५८३ झाली आहे. आतापर्यंत ४८ हजार ५३३ रुग्ण बरे झाले असून रुग्णांचे बरे होण्याचं प्रमाण ४० पूर्णांक ९७ शतांश टक्के झालं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *